Share

Akola Pattern : फडणवीस-शिंदेंनी ऋतुजा लटकेंविरोधातही वापरला होता अकोला पॅटर्न, पण इथेही तो ठरला पुर्णपणे फ्लॉप

eknath shinde rutuja latake

eknath shinde devendra fadanvis akola pattern  | अंधेरीची पोटनिवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरलेली आहे. या निवडणूकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून ऋतुजा लटके या उमेदवार उभ्या राहणार आहे. त्या शासकिय सेवेत असल्याने त्यांचा राजीनामा मंजूर केला जात नव्हता. त्यामुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास खुप अडचणी येत होत्या. पण कोर्टाने आता आदेश दिले आहे.

शुक्रवारी सकाळी ११ पर्यंत लटकेंचा राजीनामा स्वीकारा असे आदेश कोर्टाने पालिकेला दिले आहे. पण शासकीय सेवेत असल्यामुळे राजीनामा स्वीकारण्यास टाळाटाळ करणे ही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही एकदा अशा गोष्टी घडल्या आहेत. आता आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत.

अकोला येथील डॉ. अभय पाटील यांच्या प्रकरणात देखील हेच घडले होते. डॉ. अभय पाटील हे अकोल्यातून काँग्रेसकडून २०१९ मध्ये उभे राहिले होते. अभय पाटील हे सुद्धा शासकीय सेवेतच होते. त्यामुळे त्यांनाही उमेदवारी अर्ज भरण्यास अडचणी आल्या होत्या. हे त्यांनी स्वत:च सांगितले आहे.

अभय पाटील म्हणाले की, मी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होतो. पण मला निवडणूक लढवायची होती. त्यामुळे मी माझा राजीनामा दीड महिन्यापूर्वीच दिला होता. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, तर एकनाथ शिंदे हे आरोग्यमंत्री होते. त्यांनी स्पष्टपणे राजीनामा स्वीकारणार नाही, असे म्हटले होते.

पुढे ते म्हणाले, काही गोष्टी मी जाणून होतो. त्यामुळे न्यायालयीन बाबी मांडल्या असता, सचिवांनी सही करुन दिली. पण त्यानंतर मंत्र्याची सही लागणार होती. पण खरं बघितलं तर सचिवांच्या सहीनंतर मंत्र्याच्या सही गरजेचे नसते. असाच काहीसा प्रकार ऋतुजा लटके यांच्यासोबत झाला आहे.

ऋतुजा लटके यांनी १ महिन्यापूर्वीच राजीनामा दिला होता. तो मंजूर व्हायला हवा होता. स्थानिक निवडणूकीत तर राजीनामा न देता निवडणूक लढवली जाते. तिथे निवडून आल्यानंतर राजीनामा दिला जातो. पण आताची कायदेशीर प्रक्रिया आहे, असेही अभय पाटील यांनी म्हटले आहे.

शिवसेनेने पुर्ण ताकद लावली पाहिजे. माझ्याकडे कोर्टात जाण्यासाठी वेळ नव्हता. शिवसेनेकडे पुर्ण वकीलांची टीम आहे. त्यांनी अर्ज भरुन घ्यावा. या गोष्टींवर निवडणूक आयोगाचे अधिकारी कोणतीही हरकत घेऊ शकत नाही. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी बिंधास्त अर्ज भरावा, असेही अभय पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे ते म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणूकीची माझी तयारी होती. मी निवडून येईल याची मला पुर्णपणे खात्री होती. कारण मी प्रत्येक गावात खुप वर्षांपासुन फिरत होतो. मी २५-३० वर्षांपासून तिथे सामाजिक कार्य करत होतो. मला तिथल्या अडचणी, सामाजिक समस्या माहिती होत्या.

तसेच गावकऱ्यांचे अनेक समस्या मी सोडवल्या होत्या. मी आमदार खासदार नसलो तरी प्रत्येकाला मदत करण्यासाठी तत्पर असतो. २०२४ ची तयारी मी सुरु केली आहे. मी निवडून येईल यावर माझा पुर्णपणे विश्वास आहे, असेही अभय पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे ‘ते’ वाक्य ऐकताच भुजबळांच्या अश्रूंचा बांधा फुटला, व्यासपीठावरच झाले भावूक
Uddhav Thackeray : ‘ठाकरे आणि राष्ट्रवादी यांना एकत्रितपणे खंजीर चिन्ह दिलं पाहिजे, मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहे’
Sajid Khan: ‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्रीचा साजिद खानवर गंभीर आरोप; म्हणाली, मला टॉप वर करून…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now