पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस सत्ताधारी – विरोधकांनी चांगलाच गाजवला. पहाटेच्या शपथविधीचा किस्सा सांगत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विरोधी पक्षनेते अजित पवार यांची फिरकी घेतली. ‘अजितदादा तुम्ही त्यावेळी (पहाटेचा शपथविधी) जरा घाईच केली,’ असं शिंदे यांनी म्हंटलं आहे.
वाचा नेमकं घडलं काय..?
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी थेट पहाटेच्या शपथविधीचा किस्सा सांगितला. अजित दादा तुम्ही त्यावेळी थोडं सबुरीनं घेतलं असतं, तर कार्यक्रम करेक्ट झाला असता ना तेव्हा…?”, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी अजित पवारांना टोला लगावला.
पहाटेच्या शपथविधीचा किस्सा सांगताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “पहाटेचा शपथविधी सुरू होता तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला आणि टीव्ही बघत आहे का विचारलं. मी टीव्ही पाहत होतो आणि अजित पवार शपथ घेत होते. मी म्हटलं हे मागचं कधीचं दाखवत आहेत की काय? त्यावर ते म्हणाले नाही, हे आताचंच आहे.’
‘अन् तिथं देवेंद्र फडणवीस देखील दिसले. आमचे प्रमुख म्हटले मी जयंत पाटलांनाही फोन करतोय, ते फोन उचलत नाहीत. त्यावर मी त्यांना म्हटलं, जयंतराव पण तिकडेच गेले आहेत. कारण जळगावचे आमदार अनिल पाटील तिकडे मला दिसले होते, ते पाठमोरे उभे असल्याने मला ते हुबेहुब जयंतरावांसारखे दिसले, असं शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अनिल पाटील तिकडे मला सेम जयंतरावांसारखे दिसले, मग मी आमच्या प्रमुखांना सांगितलं की जयंत पाटील पण तिकडे गेले आहेत. पण, नंतर माहिती घेतली तेव्हा ते तिकडे गेले नव्हते. परंतु जयंतराव तिकडे गेले असते तर कार्यक्रम ओक्के झाला असता”, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
दरम्यान, ‘सकाळी बरोबर वेळेवर अजित पवार येतात. अजितदादा तुम्ही मला एकदा पुण्याला सकाळी आठ वाजता बोलावलं. आता आठ वाजता मी कसा येणार? असा सवाल करत शिंदे म्हणाले, मी झोपतोच पहाटे चार वाजता. तुमच्याबद्दल मला आदरही आहे,” असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
१५ दिवसांनी शुद्धीवर येताच राजू श्रीवास्तवांनी पत्नीला पाहून उच्चारले ‘ते’ चार शब्द; वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
थेट पंजाब आणि हिमाचलमधून उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा; BMC निवडणुकीत उचलणार मोठी जबाबदारी
AAP: दिल्लीतही ऑपरेशन लोटस, आपचे ४० आमदार नाॅट रिचेबल; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भर विधानसभेत जाहीर सवाल, म्हणाले, ‘आम्ही गद्दार असतो तर…