Share

VIDEO: टेबलावर चढून डान्स केला, प्लेट्स फोडल्या; बर्थडे पार्टीत मित्रांसोबत अभिनेत्रीची हुल्लडबाजी

बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने तिचा 37 वा वाढदिवस उत्साहात साजरा केला. नुसरतच्या पार्टीचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, जे पाहून तुम्हीही म्हणाल की, पार्टी असावी तर अशी. नुसरत भरुचा ग्लॅम गर्ल म्हणून तिच्या पार्टीत पोहोचली. नुसरतने डीप नेकलाइन कट आउट ट्यूब टॉप असलेला लांब स्कर्ट कॅरी केला आहे.(climbed-on-the-table-and-danced-plates-smashed-actress-rioting-with-friends)

नुसरत भरूचाने(Nusrat Bharucha) तिचा लूक अधिक स्टायलिश बनवण्यासाठी गोल्डन नेकपीस परिधान केला आहे. नुसरतने तिच्या बॅक डिझाइनला फ्लॉंट करताना  केसांचा बन बनवला होता. नुसरतच्या या लूकचे कौतुक होत आहे. नुसरतचा हा स्टायलिश लूक सर्वांनाच भावला. नुसरत वयाच्या 37 व्या वर्षी किशोरवयीन मुलीसारखी दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे होते.

नुसरतच्या वाढदिवसाच्या पार्टीचे(Birthday party इनसाइड व्हिडिओ समोर आले आहेत. नुसरतची ग्रीक शैलीतील बर्थडे बॅश चांगलीच गाजली. पार्टीत नुसरत जहाँने जबरदस्त डान्स केला. एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये नुसरत बार टेबलवर डान्स करत आहे. बर्थडे गर्लने तिच्या मित्रांसोबत खूप मजा केली.

https://www.instagram.com/p/Cdz475-PihX/?utm_source=ig_embed&ig_rid=cff5dad0-eb13-472d-8def-26bb08f00bb8

संपूर्ण पार्टीमध्ये नुसरतने आपल्या डान्सने सर्वांना आकर्षित केले आहे. गायक यो यो हनी सिंग, मनीष मल्होत्रा ​​देखील नुसरतच्या बर्थडे पार्टीत पोहोचले. नुसरतने पार्टीत ग्रीक स्टाइलमध्ये(Greek style) प्लेट्सही फोडल्या. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नुसरत भरुचाने प्लेट्स तोडण्याच्या सेगमेंटचा मनापासून आनंद घेतला.

अभिनेत्रीने तिच्या पार्टीची थीम ग्रीक शैलीत ठेवली होती, ज्यामुळे तिने त्या प्लेट्स फोडल्या. नुसरत भरुचाच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तिचा चित्रपट जनहित में जारी प्रदर्शित होत असल्याची जोरदार चर्चा आहे. नुसरत चित्रपटात कंडोम सेल्सगर्ल(Condom Salesgirl) बनली आहे. नुसरतचा चित्रपट 10 जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now