Share

पंजाबात काॅंग्रेसची पुन्हा जोरदार मुसंडी; आपचा वेग मंदावला

पंजाब विधानसभेच्या 117 जागांचे निकाल येत आहेत. गुरुवारी सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत सुरुवातीचा कल आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) बाजूने येताना दिसत होता, पण आता जरा वेगळ चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेस (Congress) जोरदार टक्कर देत पुढे निघताना दिसत आहे.(Clash between Congress and AAP in Punjab)

बातमी लिहीपर्यंत शिरोमणी अकाली दल आणि बसपा यांची युती 13 जागांवर पुढे आहे. त्याचवेळी पंजाब लोक काँग्रेस, भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिरोमणी अकाली दल-संयुक्त यांची युती 3 जागेवर पुढे आहे. काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर ते सध्या 35 जागांवर आघाडीवर आहे तर आम आदमी पार्टी 64 जागांवर आघाडीवर आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची हाफ सेंच्युरी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे.

या निवडणुकीत भाजप आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब लोक काँग्रेस सोबत युती करून निवडणूक लढवत आहेत, तर शिरोमणी अकाली दल बसपासोबत रिंगणात आहे. दुसरीकडे आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकटेच लढत आहेत.

एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आम आदमी पक्ष बहुमत मिळवू शकतो, तर काँग्रेसच्या जागा पूर्वीपेक्षा खूपच कमी होण्याची शक्यता आहे. सर्वच एक्झीट पोल्सनी आम आदमी पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे.

पंजाबमध्ये मुख्य लढत सत्ताधारी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात असल्याचे मानले जात आहे. आम आदमी पार्टीने भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे, तर काँग्रेसने मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
तुमचा आणि शिवरायांचा संबंध काय? नुसती भाडणं लावता; राज ठाकरेंनी कोश्यांरींना झाप झाप झापले
रसोडे में कौन था गाण्यानंतर छोरी पटाता है गाण्याने घातला धुमाकूळ, पहा ८२ लाख लोकांनी पाहिलेला व्हिडीओ
PHOTOS: या आहेत भोजपुरीच्या टॉप १० ग्लॅमरस अभिनेत्री; सनी लिओनी, नोरा फतेहीही पडतील फिक्या

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now