Share

पेट्रोल भरण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिकांची गुजरातमध्ये झुंबड; इतक्या कमी दराने मिळतंय इंधन, जाणून घ्या किमती

देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी गगनात झेप घेतल्यामुळे नागरिकांचे आर्थिक गणित पुर्णपणे कोलमडले आहे. अशातच गुजरातमधील पेट्रोल महाराष्ट्रपेक्षा तब्बल १४.३४ रुपयांनी स्वस्त असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील लोक गुजरातमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात असल्याचे समोर आले आहे. गुजरातच्या पेट्रोल पंपावर पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९९.८७ रुपये असा आहे.

म्हणजेच महाराष्ट्रापेक्षा गुजरामध्ये पेट्रोल १४.३४ रुपयांनी स्वस्त मिळत आहे. महाराष्ट्रात पेट्रोलवर २६ टक्के तर गुजरातमध्ये पेट्रोलवर १७ टक्के व्हॅट घेतला जातो. त्यामुळेच महाराष्ट्रापेक्षा गुजरात राज्यात पेट्रोल डिझेलचे दर १० ते १२ रुपये कमी असतात. याचाच फायदा नंदुरबारमधील नागरिक घेताना दिसत आहेत.

गुजरातचे पेट्रोल दर कमी असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील नवापूर, तळोदा, अक्कलकुवा, नंदुरबार येथील वाहनचालक गुजरात भागात पेट्रोल भरण्यासाठी जात आहेत. गुजरातमधील डिझेलचे दरही महाराष्ट्रापेक्षा कमीच आहेत. गुजरामध्ये डिझेल 4 ते 5 रुपयांनी स्वस्त आहे. याकारणानेच महाराष्ट्रातील नागरिक गुजरातमध्ये पेट्रोल डिझेल भरण्यासाठी जात आहेत.

दरम्यान गुजरामधील पेट्रोल डिझेलचे दर बघता महाराष्ट्रातील सरकारने देखील इंधनाचे दर कमी करावेत अशी मागणी होताना दिसत आहे. सध्या या इंधन दरवाढीमुळे राजकिय वर्तुळात टीकाटिपणी होत आहे. विरोधी नेते केंद्र सरकारवर निशाणा साधत इंधन दरवाढ कमी करण्यात यावी अशी मागणी करत आहेत.

दुसरीकडे राज्यातील सर्वच गोष्टीत दरवाढ झाल्यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहेत. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. मात्र तरी देखील सरकार याबाबत कोणताही भूमिका घेताना दिसत नाहीये. उलट दिवसंदिवस रोजच्या वापरातील वस्तुंच्या किंमतीही वाढताना दिसत आहेत.

युक्रेन आणि रशियामध्ये सुरु झालेल्या युध्दाचा तोटा भारताला सहन करावा लागत आहे. सोमवारी पेट्रोल जवळपास 30 पैसे आणि डिझेल 35 पैसे प्रति लीटर महागले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी देशातील चार महानगरांसह सर्व प्रमुख शहरातील इंधनाचे दर वाढविले आहे.

महत्वाच्या बातम्या
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत मोठी चूक, तरुणाने स्टेजवर जाऊन वाजवली कानशिलात, पहा व्हिडीओ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने केले मोदींचे तोंडभरून कौतुक, म्हणाला, मोदींमध्ये नक्कीच काहीतरी गुण असतील ज्यामुळे..
त्याच्या मिठीत मिळतो सपना चौधरीला ‘सुकून’ कोण आहे तो?
इस्लामाबादच्या रॅलीत इम्रान खान यांनी भारतीय मुस्लिमांचा केला उल्लेख, म्हणाले, भारतातील २० कोटी..

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now