सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेले आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी आलेल्या किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. खार पोलीस ठाण्यासमोर सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेक केली. तसेच चप्पल आणि बाटल्याही भिरकावल्या होत्या.
शिवसैनिकांकडून सोमय्यांवर करण्यात आलेल्या या हल्ल्याची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून चांगलीच दखल घेण्यात आली आहे. झेड दर्जाची सुरक्षा असूनदेखील किरीट सोमय्या यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सलग दोन वेळा हल्ला झाला आहे. यापुढे किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यास आम्ही ‘शूट अॅट साईट’चे आदेश देऊ, असा कठोर निर्णय ‘सीआयएसएफ’ने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना विचारले सीआयएसएफने मुंबई पोलिसांना खरोखरच असे सांगितले आहे का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांकडून गृहमंत्र्यांना विचारण्यात आला.
प्रसार माध्यमांच्या या प्रश्नाला उत्तर देताना दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले की,
मला असे वाटत नाही की, सीआयएसएफने असा काही आदेश दिला असेल. असा आदेश देण्याची परवानगी कोणालाच नसते. त्यांचं काम संरक्षण करणे आहे. महाराष्ट्र पोलीस किंवा सीआयएसएफ असतील अशा पद्धतीचा निर्णय कुठेही नसतो. तरीही आपल्याकडे जी माहिती आहे त्याची मी खातरजमा करेन, असे दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी म्हटले. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकार पोलिसांचा वापर अगदी नोकराप्रमाणे करत आहेत, या विरोधकांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. आता बोलणारे काही बोलू शकतात. महाराष्ट्रात अशी परिस्थिती नाही. महाराष्ट्रातील पोलीस कायद्याने काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सीआयएसएफच्या मुख्यालयाकडून सोमय्यांवरील हल्ल्याची चौकशी
सीआयएसएफच्या कमांडंटने याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी संजय पांडे यांना सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत जाब विचारण्यात आला. झेड दर्जाची सुरक्षा असलेल्या व्यक्तीच्या ताफ्यावर दुसऱ्यांदा हल्ला कसा काय होऊ शकतो? असे विचारण्यात आले. या घटनेनंतर सीआयएसएफने किरीट सोमय्या यांच्या सुरक्षा ताफ्यातील सर्व जवानांना प्रत्येक कार्यक्रमात अतीदक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालय काही कारवाई करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
मी हिच्यासाठी मरतोय; तरूणाने प्रेयसीचा फोटो फोटो अपलोड करून स्टेटस टाकले अन् काही क्षणात…
VIDEO : ‘या’ कारणामुळे सलमानच्या हातात सतत असते ‘ते’ लकी ब्रेसलेट, स्वत: सलमानने सांगितला किस्सा
देशमुखांवर झालेले १०० कोटींचे आरोप खोटे, चांदीवाल आयोगाच्या चौकशीतून धक्कादायक माहिती आली समोर
धक्कादायक ! सेलिब्रिटीची सेक्स टेप जेव्हा स्वतःच्याच मुलाच्याच हाती लागते तेव्हा…