दिग्गज अभिनेते शिवाजी साटम यांनी आतापर्यंत अनेक हिंदी आणि मराठी मालिका तसेच चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. मात्र, ‘सीआयडी’ या मालिकेतील एसीपी प्रद्युमन (CID Fame Shivaji Satam) या भूमिकेमुळे त्यांना फार लोकप्रियता मिळाली. मात्र, आता शिवाजी साटम यांना काम मिळत नसल्याचे नुकतीच एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितले आहे.
हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शिवाज साटम यांनी सांगितले की, ‘मला असं म्हणायचं नाही की, मला ऑफर्स मिळत नाहियेत. तसेच जास्त ऑफर्स मिळताहेत असेही नाही. सध्या माझ्याकडे एक-दोन ऑफर्स आहेत पण ते देखील पाहिजे तसे नाहीत. मी मराठी रंगमंचावर काम केलं आहे. मला दमदार अशा भूमिका करायला आवडतात’.
पुढे बोलताना शिवाजी साटम यांनी म्हटले की, ‘हे माझं दुर्देव आहे की, आता दमदार अशा भूमिकांचे लिखाण होत नाही. यामुळे दोन्ही बाजूने नुकसान आहे. एक अभिनेता म्हणून मला एका चांगल्या भूमिकेची उणीव भासत आहे आणि प्रेक्षकांना चांगल्या कलाकारांची उणीव भासत आहे’.
साटम यांनी त्यांना मिळणाऱ्या ऑफर्सविषयी बोलताना सांगितले की, ‘मला केवळ पोलिसांची भूमिका असणारे ऑफर्स मिळत आहेत. पण जवळपास दोन दशकापासून मी पोलिसाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे आता मी पुन्हा तीच तीच भूमिका करू इच्छित नाही’.
यावेळी साटम यांना विचारण्यात आले की, ‘त्यांना परत एसीपी प्रद्युमन ही भूमिका साकारायला आवडेल का?’ तेव्हा यावर उत्तर देताना त्यांनी म्हटले की, ‘जर हा शो पुन्हा सुरु होत असेल तर या भूमिकेसाठी मी सर्वात पहिला उभा असेन. एसीपी प्रद्युमनच्या भूमिकेचा मला कधीच कंटाळा आलेला नाही. पण घरी बसून बसून मला कंटाळा आला आहे’.
दरम्यान, शिवाजी साटम यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी १९८० साली ‘रिश्ते-नाते’ या मालिकेद्वारे मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ते ‘फेमस ट्रायल्स ऑफ इंडिया’, ‘एक शून्य शून्य’, ‘ए माऊथमुल ऑफ स्काई’ यासोबत इतर अनेक मालिकांमध्ये दिसले. तसेच ‘वास्तव’, ‘कुरूक्षेत्र’, ‘जिस देश में गंगा रहता हैट, ‘यशवंत’, ‘चायना गेट’, ‘सूर्यवंशम’, ‘हसीन दिलरूबा’ या चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
सारा-विक्कीच्या चित्रपटाच्या शुटींगमुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ, घडले असे काही की..
PHOTO: शुटींगनंतर कतरिना घेत आहे विक्की कौशलची काळजी, बेडरुममधील फोटो झाला व्हायरल
सुंदर आणि तरूण दिसण्यासाठी माधुरी खाते ‘हे’ खास प्रकारचे सॅलड, वाचा त्याचे आरोग्यदायी फायदे






