Share

मुलीला कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना चंकी पांडेने दिले सडेतोड उत्तर, म्हणाला, तिने कोणते कपडे घालावेत याबाबत..

अभिनेता चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या ग्लॅमरस लुक्समुळे अनेकदा चर्चेत असते. सध्या ती चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस लूक असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोवर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. अशावेळी तिच्या वडिलांनी तिला साथ देत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

धर्मा प्रॉडक्शनचा माजी सीईओ अपूर्व मेहता याच्या वाढदिवसाच्या पार्टीत अनन्या पांडे कुटूंबासह सहभागी झाली होती. त्यावेळी तिनं अत्यंत बोल्ड असा ड्रेस घातला होता. त्या ड्रेसमधील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिचे हे फोटो पाहून युझर्स तिला ट्रोल करत आहेत.

यात अनन्याने ग्लॉसी मेकअप केला होता. त्याशिवाय केस थोडे कुरळे केले होते. शिवाय तिच्या हातामध्ये काळ्या रंगाचाच डिझायनर क्लच होता. तसंच तिनं ड्रेसला मॅचिंग होतील असे, काळ्या रंगाचे हिल्सही घातले होते. हे फोटो पाहून युझर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

एका युजर्सने लिहिलं की, अगं तू पँट घालायला विसरलीस बहुतेक, दुसऱ्या एकानं लिहिलं, हॉलीवूडची नक्कल करण्याचा संघर्ष सुरूच आहे. एका यूजरने लिहिले ‘मॉडर्न स्विमसूट.’ एक म्हणाला, ‘संपूर्ण बॉलीवूड नशेत आहे.’ अशा विविध प्रतिक्रियांचा तिला सामना करावा लागला.

अशा वेळी, तिचे वडील म्हणजेच अभिनेता चंकी पांडे यांनी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, अशा कपड्यांनी जर तिच्या वडिलांना कोणतीच समस्या नसेल तर मला वाटत नाही की इतर कोणाला काही समस्या असायला हवी. अशा ट्रोलिंगचा परिणाम स्वत:वर कधीच करून घ्यायचा नाही.

तसेच म्हणाले, ‘ एक आई वडील म्हणून आम्ही नेहमीच तिला विचारांचं स्वातंत्र्य दिले आहे. तिनं कोणते कपडे घालावे किंवा नाहीत याबाबत आम्ही कधीच तिला सल्ला दिला नाही. दोन्ही मुलींना आम्ही खूप चांगली शिकवण दिली आहे. माझी मुलं समजूतदार आहेत. मी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देतो.

मनोरंजन इतर

Join WhatsApp

Join Now