बातमी आहे ती उत्तर प्रदेशची आहे. जिथे राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशाच्या गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ अयोध्येत चौक बांधण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यूपीमधील निवडणुकीच्या प्रचारावेळी योगींनी याबाबत घोषणा केली होती. लता मंगेशकर यांना ही श्रद्धांजली असेल, असे ते म्हणाले होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ६ मे रोजी अयोध्येत भगवान रामलल्लाचे दर्शन करण्यासाठी आले होते. ते म्हणाले होते की, अयोध्येत लता मंगेशकर यांच्या नावे चौक उभारून आश्वासनाची पूर्तता केली जाईल. यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यास त्यांनी सांगितले आहे.
अयोध्येत भगवान श्रीरामांचे दर्शन करणारे भाविक लता मंगेशकर यांचे नाव असलेल्या चौकातून हनुमान गढी व राम जन्मभूमीकडे जातील, असं देखील त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशात पुढील १५ दिवसांत अयोध्येतील एका मोठ्या चौकाची ओळख करून दिवंगत लता मंगेशकर यांचे नाव देण्यात यावे, असे म्हटले आहे.
योगींनी दिलेल्या आदेशानंतर अयोध्या महानगरपालिका चांगलीच कामाला लागली आहे. योगींचे आदेश येताच महानगरपालिकेने शहरातील प्रमुख ठिकाणांची माहिती घेण्यास सुरुवात केली असल्याची माहिती मिळत आहे. ‘येत्या १० दिवसांत एक जागा निश्चित करण्यात येईल,’ असं अयोध्येचे महापौर हृषिकेश उपाध्याय यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘स्वर कोकिळा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाले. मात्र करोडो चाहत्यांच्या मनामध्ये अजूनही त्या आहेत. लता मंगेशकर यांनी देशभक्तीपर गाण्यांपासून ते चित्रपटातील गाण्यांपर्यंत आपल्या संगीताने लोकांच्या हृदयावर राज्य केले आहे.
याचबरोबर लता मंगेशकर यांचे या वर्षी ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. देशातील सर्वात प्रसिद्ध गायिका, लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत ५० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. आजही त्यांचा आवाज आपल्या कानात ऐकू येतो.
महत्त्वाच्या बातम्या
राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या भाजप खासदाराला महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा पाठिंबा; फोन केला अन्…
राज ठाकरेंचा बाप सुद्धा माफी मागितल्या शिवाय अयोध्येत येऊ शकत नाही; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
डॉक्टरेट सोडून अभिनेता होण्यासाठी आला होता मुंबईत, आता पृथ्वीराजमध्ये ‘मोहम्मद घोरी’ बनून सगळ्यांवर पडतोय भारी
whats app: आता कोणीही वाचू शकणार नाही तुमची पर्सनल चॅट, फक्त एकदा ऑन करा ही सेटिंग