माढा तालुक्यातील अकोले गावचे शेतकरी सुरज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन केले आहे. त्यांच्या शेतावर स्थानिक गावगुंडांनी बेकायदा कब्जा केल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबत वारंवार दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने पाटील यांनी हे टोकाचे पाऊल उचललं आहे. (when will the government get drunk chitra waghs question)
याचाच धागा पकडत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. आणि या बैठकीत वाईनविक्री बाबत निर्णय घेण्यात आला. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर भाजप कडून सडकून टीका होतं असतानाच आता चित्र वाघ यांनी देखील भाष्य केले आहे.
ट्विट करत त्या म्हणतात, ‘शेती वादातून सुरेश पाटील या शेतकऱ्यानं सोलापूर जिल्हाधिकाऱ्यासमोरच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. बांधावर जाऊन समस्या सोडवण्याच्या वल्गना करणारे मुख्यमंत्री घरात बसून शेतकऱ्यांच्या दारात वाईन पोहोचवण्याचं काम करताहेत. शेतकऱ्यांच्या समस्या कधी सोडवणार मद्यधुंद सरकारची नशा कधी उतरणार?’ असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
https://twitter.com/ChitraKWagh/status/1488377263900934144?s=20&t=QlPFnXJ95rJlBSBBHXQM7Q
तसेच या निर्णयावर शेतकरी नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही सडकून टीका केली आहे. मंदिरात पण्याऐवजी वाईन द्या म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, ‘“राज्यातील महाविकास आघाडी ही मद्यविक्री विकास आघाडी आहे. शेतकऱ्यांच्या नावावर दुकानदारी खपवण्यासाठी वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला गेला. आता गावातल्या दुधाच्या डेअरी बंद करा आणि वायनरी काढा,” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
दरम्यान, ठाकरे सरकारच्या या निर्णयाला वेगवेगळ्या क्षेत्रांतून विरोध होत आहे. अनेक संघटना ठाकरे सरकारच्या या निर्णयाला विरोध करत आहे. आता नागपूरमधील चिल्लर किराणा व्यापारी संघटनेनेही दुकानातून वाईनची विक्री करण्यास विरोध केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
आजपासून तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम, बँक आणि सिलिंडरसह अनेक नियमांमध्ये बदल
खुशखबर! गाड्यांचे रजिस्ट्रेशन आता कुठूनही करता येणार; अर्थसंकल्पात ऑटो सेक्टरला मोठा दिलासा
जागो ग्राहक जागो! ऑफरच्या नावाखाली ग्राहकांची होतेय फसवणूक, खाली होतोय खिसा
एकुलत्या एक मुलीचा गिझर मधून गॅस गळती झाल्याने मृत्यू; आईने फोडला हंबरडा