Share

‘पावनखिंड’ चित्रपटाला मिळालेले प्रेम पाहून भारावून गेला चिन्मय मांडलेकर; म्हणाला, ‘आम्ही धन्य झालो’

Chinmay Mandlekar

‘पावनखिंड’ (Pawankhind) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरु आहे. चित्रपटाचे कथानक यामधील कलाकारांचे अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. यादरम्यान चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रेम पाहून अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) भारावून गेला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

चिन्मय मांडलेकरने ‘पावनखिंड’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रेम पाहून आम्ही धन्य झालो आहोत, असे त्याने एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे. चिन्मयने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका सिनेमागृहातील आहे. यामध्ये ‘पावनखिंड’ चित्रपट संपल्यानंतर काही युवक शीवगीत गाताना दिसत आहेत.

व्हिडिओ शेअर करत चिन्मयने लिहिले की, ‘गेल्या दोन वर्षात अनेकांनी विचारलं ‘पावनखिंड ओटीटीवर का प्रदर्शित करत नाही?’ हे आहे त्याचं उत्तर. स्वास्थ्यासाठी सामाजिक अंतर राखायलाच हवं. पण सामाजिक स्वास्थ्यासाठी लोकांनी एकत्र येऊन काहीतरी साजराही करायला हवं. प्रेक्षकहो तुम्ही ‘पावनखिंड’ साजरा करताय. आम्ही धन्य झालो!’

दरम्यान, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १८ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. सिनेमागृह ५० टक्के क्षमतेने सुरु असतानाही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाची घौडदौड यशस्वीरित्या सुरु असून १० दिवसांतच चित्रपटाने १६.७१ कोटींचा व्यवसाय केला आहे.

‘पावनखिंड’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. यापूर्वी त्यांनी फर्जंद आणि फत्तेशिखस्त या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. तर या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यानंतर आता ‘पावनखिंड’ हा चित्रपट त्यांनी संकल्प केलेल्या ‘शिवराज अष्टका’तील तिसरं पुष्प आहे. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

ए. ए. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आल्मंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. चिन्मयसोबत या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, अंकित मोहन, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, असे अनेक कलाकारसुद्धा मुख्य भूमिकेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
अंकिता लोखंडेने विकत घेतली आलिशान मर्सिडीज कार, किंमत वाचून डोळे पांढरे होतील
अशुद्ध मराठी बोलणाऱ्यांना सोनालीने मारला टोमणा, नेटकऱ्यांनी तिच्याच चुका काढत झापले
शिबानी दांडेकरने प्रेग्नेन्सीच्या चर्चांवर सोडले मौन, म्हणाली, टकीला जास्त पिल्यामुळे मला..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now