Share

चिनी सैन्याने अरुणाचलमधून केले अल्पवयीन मुलाचे अपहरण; खासदाराची मोदींना मदतीसाठी विनवणी

चिनी सैन्याने(पीपल्स लिबरेशन आर्मी) भारतीय हद्दीत घुसखोरी करून अरुणाचल प्रदेशातून (Arunachal Pradesh) 17 वर्षीय भारतीय मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. चिनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसून भारतीय तरुणाचे अपहरण केले.

अपहरण झालेल्या मुलाच्या सुखरूप सुटकेसाठी भाजप खासदाराने केंद्राकडे ट्वीट करत विनंती केली आहे. अरुणाचल पूर्वचे खासदार तपिर गाओ यांनी बुधवारी ट्वीट करत ही धक्कादायक माहिती दिली. राज्यातील भारतीय हद्दीतील अपर सियांग जिल्ह्यातून एका 17 वर्षीय तरुणाचे अपहरण केले आहे.

अपहरण झालेल्या तरुणाचे नाव मीरम तरोन असे आहे. अरुणाचल प्रदेश येथील शियांग नदी भारतात प्रवेश करते त्या ठिकाणाजवळ ही घटना घडल्याचे समजले आहे. 18 जानेवारीला चिनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली. चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशमधील अप्पर सियांग जिल्ह्यात लुंगता जोर येथून 2 मुलांचे अपहरण केले.

मीरम तरोन आणि जॉनी यायिंग असे त्यांची नावे आहे. हे दोघेही झिडो या गावातील रहिवाशी आहेत. मीरम आणि जॉनी हे दोघे दोस्त आहेत. चिनी सैन्याने दोघांचेही अपहरण केले होते. मीरमचा दोस्त जॉनी हा चिनी सैन्याच्या तावडीतून निसटला आहे.

मीरमचा अजूनही काही पत्ता लागलेला नाही. मीरमचा मित्र जॉनी यानेच ही सर्व घटना भारतीय लष्कराला सांगितली आहे. गाओ यांनी मीरमच्या सुटकेसाठी तातडीने पाऊले उचलावीत असे ट्वीट करत केंद्र सरकारकडे विनंती केली आहे.

गाओ यांनी आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टॅग केले आहे. त्या दोन मुलांचे फोटोही शेयर केले आहेत. या पूर्वीही चिनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now