जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैनिकांमध्ये झटापट झाली होती. त्या झटापटीत चीनचे ३८ सैनिक ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. झटापट झाल्यानंतर चीनन केवळ चारच सैनिक ठार झाल्याचे सांगितले होते. परंतु, ऑस्ट्रेलियातील ‘द क्लैक्सन’ या वृत्तपत्राने चीनचे चार नाही, तर 38 सैनिक या झटापटीवेळी गलवान नदीत वाहून गेल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे चीनचा खोटा बुरखा समोर आला आहे.(China’s veil covering death toll rises, 38 Chinese soldiers killed)
‘द क्लैक्सन’ वृत्तपत्राने म्हटले आहे की, “चीनच्या पीपल्य लिबरेशन आर्मीची भारतीय सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत चीनने जो मृतांचा आकडा सांगितला आहे, त्यापेक्षा नऊ पटीने जास्त सैनिक ठार झाले आहेत. झटापटीवेळी अंधारात गलवान नदीत चीनचे ३८ सैनिक वाहून गेल्याचे वृत्तदेखील ऑस्ट्रेलियातील ‘द क्लैक्सन’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.
गलवान नदी ही अतिशय वेगाने वाहत असते. त्यामुळे त्यावेळी चीनचे ३८ सैनिक गलवान नदीत वाहून गेले होते. तब्बल एका वर्षाच्या तपासानंतर एका सोशल मीडियाच्या संशोधकांच्या टीमने हे शोधून काढले. याबाबत या समूहाने एक अवहालही तयार केला आहे. ‘द क्लैक्सन’ वृत्तपत्राने आपल्या वृत्तात हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
वृत्तपत्राचे म्हणणे आहे की, चीनने जाहीर केलेल्या मृत सैनिकांपैकी फक्त एक सैनिक ज्युनियर सार्जंट वांग झुओरन बुडाल्याची नोंद आहे. परंतु अहवालात असे म्हणाले आहे की, त्या रात्री वांगसोबत चीनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेले होते.
या अहवालात चिनी ब्लॉगर्ससोबतची चर्चा, काही चीनच्या नागरिकांकडून मिळालेली माहिती आणि चीन सैनिकांच्या मोठ्या जीवितहानीबद्दल मीडिया रिपोर्ट्सचा एक वर्षभर चाललेला तपास यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती. १५ आणि १६ जून च्या रात्री ही घटना घडली होती. सीमेवरील या झटापटीत २० भारतीय सैनिकांना वीरमरण आले. या झटापटीत चीनने आपले फक्त चारच सैनिक ठार झाल्याचे सांगितले होते. मृतांची संख्या लपविण्याचा प्रयत्न चीनने त्यावेळी केला होता. परंतु ऑस्ट्रेलियाच्या या वृत्तामुळे चीनचे खोटे समोर आले.
महत्वाच्या बातम्या
मालेगावात आढळल्या खंडोबारायाच्या वास्तव्याच्या खुणा, पुण्यातील भक्ताला ‘असा’ दिला दृष्टांत
साताऱ्याची बहिण बारामतीच्या भावासाठी आली धावून, यकृत दान करत वाचवले प्राण