स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका करणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड. तिच्या एक फेसबुक पोस्टचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना रोज नवनवे फॅन्स भेटत असतात. अशी एक फॅन छोटी लहान मुलगी प्राजक्ताला भेटली. त्या लहान मधू नावाच्या मुलीसोबत प्राजक्ताच सुंदर नातं तयार झालं. त्याबाबत तिने पोस्ट मध्ये लिहिले आहे, ‘एक नातं प्रेक्षकांसोबतचं….’ (swarajya rakshak sambhaji, mazi aai kalubai, prajkta gayakwad , alka kubal, facebook post )
पुढे पोस्टमध्ये प्राजक्ताने त्या लहान मधुबद्दल सांगितले आहे की, हि चिमुरडी “मधु” आणि तिच्या हून थोडी मोठी असलेली तिची बहीण मृण्मयी. सकाळी ९वाजता जसं outdoor shoot सुरु झालं तसं तिनं मला सोडलंच नाही. फोटो काढण्यासोबत तिचा हट्ट होता… “दिदी तू चहा प्यायला आमच्या घरी चल.” मी म्हटलं बाळा अगं मी चहा नाही पित. तर ती म्हणाली “मग दूध,सरबत घे…पण चल घरी.”
प्राजक्ताला या लहान मुलीने तिच्या गोड, प्रेमळ स्वभावाने भुरळ घातली होती. प्राजक्ता म्हणते, खरंतर भरपूर लोक shoot पहायला , फोटो काढायला येत होते..पण या चिमुरडीच्या चिकाटीला आणि उत्साहाला सलाम ! नंतर तर ती नऊवारी साडी घालून नटून आली.
एक अभिनेत्री असून काही वेळातच रक्ताची नसले तरी प्रेमाची दिदी झाले.
प्राजक्ताचे संपूर्ण महाराष्ट्रभरात फॅन्स आहेत. स्वराज रक्षक संभाजी मालिकेमुळे ती अल्पावधीतच खुप लोकप्रिय झाली. येसूबाईंच्या व्यक्तिरेखेमुळे तिचा जबरदस्त अभिनय लोकांच्या पसंतीस उतरला. ती मालिका संपल्यानंतर तिने ‘माझी आई काळूबाई! या मालिकेत काही काळ काम केले होते. प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल निर्मित या मालिकेतुन प्राजक्ता लवकर बाहेर पडली कारण तिचे सहायक दिग्दर्शक व इतर लोकांशी वाद झाले होते.
आई काळूबाई मालिकेच्या सेटवर मला वाईट वागणूक दिली गेली, शिवीगाळ झाली. असा आरोप प्राजक्ताने केला होता. या प्रकरणात माझी चूक नव्हती. एक बाई असून देखील निर्माती अलका कुबल यांनी माझी बाजू घेतली नाही. असा गंभीर आरोप प्रसारमाध्यमांसमोर प्राजक्ताने अलका कुबल यांच्यावर केला होता.
प्राजक्ता गायकवाड तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी ओळखली जाते. तिने तिच्या सुंदर, सौज्वळ रूपाने कायम प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. महाराष्ट्रात प्राजक्ता गायकवाडचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याच प्रेक्षकांच्या प्रेमाचा मधूच्या रूपाने प्राजक्ताला प्रत्यय आला असे म्हणता येईल.
महत्वाच्या बातम्या
ईडी योगी आदित्यनाथांवर छापे मारणार का?
करणी सेनेच्या तक्रारीनंतर अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चे बदलले नाव, आता ‘या’ नावाने होणार रिलीज
काकीकडून उधार पैसै घेऊन मुंबईत आला होता ‘हा’ अभिनेता, नंतर बनला बॉलिवूडचा ‘पितामह’
VIDEO: कोहलीने सर्वांना मिठी मारली पण रजत पाटीदारला दिली अशी वागणूक, नेटकरी संतापले, म्हणाले..