(Narendra Modi): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या म्हणजेच १७ सप्टेंबरला वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा आयोजित केला आहे. यामध्ये भाजपचे कार्यकर्ते जनतेशी संवाद साधतील. तसेच समाजसेवेशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
वृक्षारोपणाचा कार्यक्रम, रक्तदान शिबीर, दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि उपकरणाचे वाटपही करण्यात येणार आहे. २०२५ पर्यंत टीबी मुक्त भारत हे उद्दिष्ट समोर ठेवून रुग्णांना एक वर्ष पोषक आहार आणि उपजिविकेच्या संबंधितही मदत करणार आहे. विभागीय स्तरावर सर्व जिल्ह्यांमध्ये दोन दिवसीय स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
जनतेशी संवाद साधण्याचा एक भाग म्हणून भाजप देशभरात ‘जल ही जीवन’ आणि ‘स्थानिकांसाठी आवाज’, ‘विविधतेत एकता’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ’ याविषयी मोहीम राबविणार आहे. तर दुसरीकडे तामिळनाडूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्य मोठा इव्हेंटच आयोजित केला आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवशी जन्मलेल्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी देण्याचे जाहीर केले आहे.
इतकेच नाही तर यावेळी नियोजित इतर योजनांमध्ये ७२० किलोग्रॅम मासेही वाटण्यात येणार आहे. भाजपच्या तामिळनाडूमधील युनिटने माहिती दिली आहे की, चेन्नईमधील आर एस आर एम या हॉस्पिटलमध्ये १७ सप्टेंबरला जन्मलेल्या मुलांना सोन्याची अंगठी देण्यात येईल. मत्सव्यवसाय आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांना अंगठी वाटप कार्यक्रमासाठी होणाऱ्या खर्चाबाबत विचारण्यात आले.
तेव्हा ते म्हणाले की, प्रत्येक अंगठी किमान २ ग्रॅमची असेल आणि तिची किंमत ५००० रुपयांपर्यंत असेल. ही काही वाटली जाणारी रेवाडी नाही तर आम्ही त्या बालकांचे स्वागत करणार आहोत. या रुग्णालयात जवळपास १० ते १५ बालकांचा जन्म होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. पंतप्रधान मोदी आता ७२ वर्षांचे होत आहे.
तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मत्स संपदा योजना राबविण्यात येत आहे. त्या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी तामिळनाडूमध्ये ७२० किलो मासे वाटण्यात येणार आहे. ७२० हा आकडा निवडण्याचे कारण हेच की, पंतप्रधान मोदी ७२ वर्षाचे होणार आहे. मासे वाटण्यासाठी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
Toll: बापरे! समृद्धी महामार्गावर टोल भरताना वाहनचालकांचे कंबरडे मोडणार, टोलची रक्कम ऐकून डोळे फिरतील
Shinde Group : शिंदे गटात जाताच प्रताप सरनाईकांना ईडीचा मोठा दिलासा; लवकरच केसही बंद होणार?
बायका परपुरूषांच्या संपर्कात येतील म्हणून ‘या’ पुरग्रस्त गावातील लोक घर सोडायला नाहीत तयार
amruta fadnavis : “ठाकरे सरकारमुळेच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकला नाही”: अमृता फडणवीस