Mathematics, Neelkanth Bhanu Prakash Jonalgadda, B Capital/ नीळकंठ भानू प्रकाश जोनलगड्डा (Neelkanth Bhanu Prakash Jonalgadda), एका झटक्यात आकडे-मोड करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याला देशातच नाही तर जगात ‘ह्युमन कॅल्क्युलेटर’ म्हणून ओळखले जाते. ज्यांनी लोकांच्या मनातून गणिताची भीती घालवण्यासाठी भांजूची (Bhanzu) सुरुवात केली. त्यानी या मिशन अंतर्गत लोकांसाठी गणित सोपे केले आहे.
दरम्यान, त्याच्या स्टार्टअप भांजूला सिरीज-ए-फंडिंग राउंडमध्ये 15मिलियन डॉलर (सुमारे 120 कोटी) मिळाले आहेत. आणखी एक जागतिक गुंतवणूकदार बी कॅपिटलनेही एसेंट फंडातून यात गुंतवणूक केली आहे. नीळकंठ भानू स्टार्ट-अप भांजू कडून मिळालेल्या निधीसह आपले शिकण्याचे व्यासपीठ अधिक वाढवेल. जेणेकरून गणित अधिकाधिक लोकांना सोप्या पद्धतीने समजावून सांगता येईल.
लंडन येथे झालेल्या माइंड स्पोर्ट्स ऑलिम्पियाड 2020 मध्ये नीळकंठने भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. या स्पर्धेत 13 देश सहभागी झाले होते. नीळकंठने पहिल्यांदाच मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. स्कॉट फ्लेन्सबर्ग आणि शकुंतला देवी यांच्या नावाचे रेकॉर्डही त्यानी मोडले. माइंड स्पोर्ट्स ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान, नीळकंठच्या वेगामुळे जज इतके आश्चर्यचकित झाले की, त्यांनी त्याला काही अतिरिक्त प्रश्नही विचारले.
नीळकंठ हा मूळचा हैदराबादमधील मोती नगरचा आहे. सर्वात जलद आकडेमोड करण्याचा विश्वविक्रम नीळकंठच्या नावावर आहे. त्याला जगातील सर्वात वेगवान मानवी कॅल्क्युलेटर म्हटले जाते. नीळकंठने 50 लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही आपले नाव नोंदवले आहे. दिल्लीच्या प्रतिष्ठित सेंट स्टीफन्समधून पदवी घेतलेल्या नीळकंठला मेंटल एरिथमेटिक (अंकगणिता)चे मास्टर मानले जाते. 2020 मध्ये त्यानी गणित शिकण्याचे व्यासपीठ भांजू सुरू केले.
नीळकंठ भाजूला लोकांमधील गणिताची भीती घालवायची आहे. तो सांगतो की, लोकांमध्ये मार्कांबद्दल खूप भीती आहे आणि ही भीती घालवण्यासाठी त्यानी भांजूची स्थापना केली. जे ग्लोबल मॅथ्स लर्निंग ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. जे विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने गणित शिकण्यास मदत करते. त्याचा अभ्यासक्रम नीळकंठ यानी स्वतः तयार केला आहे.
सुरुवातीला सुमारे 100 विद्यार्थी त्याच्याशी जोडले गेले. हळूहळू ही संख्या वाढत गेली. आता लाखो विद्यार्थी त्याच्या वर्गाचा लाभ घेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीळकंठ प्रोजेक्ट इन्फिनिटी अंतर्गत अनेक सरकारी शाळांशीही संबंधित आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, नीळकंठ भानू म्हणतो की, माझा विश्वास आहे की देशातील प्रत्येक मूल गणित शिकण्यास सक्षम आहे. आमचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या मनातून गणिताची भीती काढून टाकण्यास मदत करतो. याशिवाय, विज्ञान आणि अभियांत्रिकीसारख्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरणा देते.
महत्वाच्या बातम्या-
फक्त चार आमदारांची नाराजी करू शकते एकनाथ शिंदेंचा खेळ खल्लास; काय आहे नेमकं गणित वाचा
Girish Bapat : ‘होय मी पक्षावर नाराज आहे’; सत्तेची गणिते जुळवण्यासाठी कोणालाही..; गिरीष बापट स्पष्टच बोलले
Shinde group : ‘इथे’ फसणार शिंदे गटाचं गणित; इंदीरा गांधींचा दाखला देत राज्यातील बड्या नेत्याचा खुलासा