मुंबई कुर्लामधील शिवसेनेचे आमदार संजय पोतनिस आणि नगरसेविका प्रविणा मोरजकर यांच्यात सुरु असलेला वाद आता चव्हाट्यावर आला आहे. मुख्य म्हणजे या दोघांच्यात सुरु असलेल्या वादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी लक्ष घातले आहे.
त्यानुसार या दोघांनी संजय पोतनीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ऐन निवडणूकीच्या काळातच शिवसेनेत अंतर्गत वादविवाद होण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात संजय पोतनिस यांच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत.
जर चौकशीत पोतनिस चुकीचे आढळून आले तर पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कुर्ला येथील शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका प्रविणा मोरजकर या आहेत. मोजरकर यांनी त्यांच्या मतदारसंघात म्हाडा अंतर्गत केलेल्या विकास कामांचे उद्घाटन मुंबई म्हाडाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांच्या हस्ते करण्याचे नियोजित केले होते.
पंरतु हे उद्घाटन विनोद घोसाळकर यांनी करु नये अशी इच्छा पोतनिस यांची होती. त्यामुळे पोतनिस यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन पडद्यामागुन काही कारस्थान रचली.
त्यांची ही कारस्थान थेट मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेली. त्यामुळे पक्षाची शिस्त मोडल्यामुळे उध्दव ठाकरे पोतनिस यांच्यावर नाराज झाले आहेत.
तसेच त्यांनी विनोद घोसाळकर यांना विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी निमंत्रीत केले आहे. त्यामुळे आता लवकरच कुर्ला येथील विकास कामांचे उद्घाटन होणार आहे. दुसऱ्या बाजूला पोतनिस यांच्यावर सुध्दा कारवाई करण्यात येईल. शिवसेनेत सुरु असलेला हा पक्षांतर्गत वाद आता सर्वांनसमोर आला आहे.
जर महापालिका निवडणूकीपर्यंत हा वाद मिटला नाही तर त्यांचा परिणाम पक्षाला भोगावा लागणार आहे. सध्या शिवसेना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुर्ला येथील विकास कामांवर जास्त लक्ष देताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
क्रिकेटर्स माझ्याकडे टक लावू बघायचे, माझा अपमान करायचे, मंदिराने सांगितला भितीदायक अनुभव
अनुपम खेर यांचे शर्टलेस फोटो व्हायरल; फिटनेसच्याबाबतीत अनिल कपूर यांनाही देताहेत टक्कर
अवॉर्ड शोमध्ये ‘बबीता जीं’ना पाहून जेठालालचे झाले असे हाल; नेटकरी म्हणाले, ‘जेठालाल लाजत आहे’
लघवीचा रंग सांगू शकतो तुम्हाला कोणता आजार झाला आहे, अशाप्रकारे जाणून घ्या आणि सावध व्हा