मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी केला होता. यासाठी राणा दांपत्य खार येथील आपल्या घरी दाखल झाले होते. २३ एप्रिल रोजी राणा दांपत्य मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करणार होते.
त्यामुळे त्यांना विरोध दर्शवत अनेक शिवसैनिक मातोश्री निवासस्थानाबाहेर पहारा देण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून आले. यामध्ये ९२ वर्षांच्या चंद्रभागा शिंदे यांचा देखील समावेश होता. चंद्रभागा शिंदे सकाळपासून मातोश्रीबाहेर पहारा देत उभे होते.
त्यामुळे चंद्रभागा यांची शिवसेनेवरील निष्ठा पाहून थेट उद्धव ठाकरेच त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. उद्धव ठाकरे चंद्रभागा यांच्या घरी गेल्यामुळे याठिकाणी आयोजित करण्यात आल्याची भाजपची पोलखोल सभा रद्द करण्यात आली. चंद्रभागा यांच्या निवासस्थानाबाहेर ही सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेला भाजप नेते नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर उपस्थित राहणार होते. मात्र उद्धव ठाकरे चंद्रभागा यांच्या घरी गेल्यामुळे भाजपच्या सभेसाठी उभारण्यात आलेला स्टेज मोडावा लागला आणि सभा रद्द झाली. त्यामुळे संतप्त होऊन भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. पुढे सभा रद्द करण्यात आल्याची माहिती नितेश राणा यांना समजतात त्यांनी देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
यावेळी, “सभेला मुख्यमंत्री आणि सरकार घाबरत आहे, सोमवारी आपण ही सभा दणक्यात घेऊ” अशी टीका नितेश राणे यांनी केली. त्याचबरोबर, “शिवसेनेने कधी नाही तर आमची दखल घेतली, इथल्या नगरसेविकेने मुख्यमंत्री यांना विनवणी केली की, काही पण करून आज इथे या, पण आमच्यामुळे एका आजीला घर मिळाले.
यात समाधान आहे. ते फ्रीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना चार्ज करुन गेले आहेत.” असे नितेश राणे यांनी म्हणले. “आजची सभा उद्या होईल ऑन दणक्यात होईल, यावरून हे कळले आहे की, शिवसेना आमच्या पोलखोल सभेला किती घाबरते” अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
महत्वाच्या बातम्या
‘या’ महाविद्यालयात शिकवला जाणार पोर्नोग्राफीवर अभ्यासक्रम; वाचा कोर्सची संपुर्ण डिटेल्स..
उद्धवस्त ठ…..ने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? अमृता फडणवीसांची जहरी टिका
भारतीय क्रिकेटला धक्का, मुंबईच्या वेगवान गोलंदाजाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
‘SC-ST, OBC समाजातील लोक उच्च जातीतील लोकांपेक्षा ४ ते ६ वर्षांनी कमी जगतात’; रिपोर्टमधून खुलासा