नुकतीच महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना तातडीने मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अशा स्थितीत अचानक मंत्र्यांना मुंबईत का बोलावण्यात आले, हे अद्याप गूढच आहे. मात्र या बातमीची महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व मंत्र्यांना मुंबईत बोलावले आहे. त्यामुळे लवकरच मुंबईबाहेरील सर्व मंत्री मुंबईला रवाना झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मंत्री आज मुंबईत हजर राहणार आहेत. आता या घटनेची महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांचा आदेश येताच सर्व मंत्री आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईला रवाना झाले. सर्व मंत्री आज दुपारी मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर सर्व मंत्र्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. ही बैठक अचानक का बोलावण्यात आली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय केव्हाही जाहीर होऊ शकतो, अशी माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीला मंत्री शंभूराज देसाई, उदय सामंत, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कायदेतज्ज्ञ ही उपस्थित असतील. मराठा आरक्षणाबाबत पुढील कायदेशीर वाटचाल कशी असणार? या विषयावर चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.
तसेच, महाराष्ट्रातील अलीकडच्या घडामोडी पाहता या बैठकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तर मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर राज्य सरकारने केलेली पुनर्विचार याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर लगेचच ही बैठक घेण्यात येत आहे. त्यामुळे आता शिंदे सरकार राजकारणात कोणती नवी खळबळ उडवते ते पाहाणं महत्वाच ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
मुंडे बंधू भगिनी एकत्र येण्याच्या मार्गावर; आता धनंजय मुंडेंनी पंकजांना दिले ‘हे’ जबरदस्त रिटर्न गिफ्ट
बॉलिवूडमधील सर्वात सेक्सी अभिनेत्री कोण? रविंद्र जडेजाने सांगीतलेल्या नावाने टीम इंडियात राडा
समृद्धी महामार्गावर प्रसिद्ध मराठी क्रिकेटपटूचा भीषण अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू तर क्रिकेटर…