Eknath Shinde: शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षाच्या भूमिके विरोधात जात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. त्यांनी भाजपला सोबत घेऊन सत्ता काबीज केली. तेव्हापासून शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा रोज पाहायला मिळतो. मात्र प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसाठी मवाळ भाषा वापरली आहे.
विश्व मैत्री दिनानिमित्त जैन महामंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात,’ असं म्हणत एकनाथ शिंदेंनी मैत्रीचा दाखल देत मनोमिलन करण्याची तयारी दाखवल्याचे दिसते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले, ‘मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात, पण त्यासाठी मोठं काळीज असावं लागतं,’ असं बोलत त्यांनी अप्रत्यक्ष्यपणे मैत्रीचे हे प्रकरण न्यायालयाच्या निर्णययावर सोडून दिले.
जैन महामंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून शिंदेंनी जैन साधू ,साध्वी यांना अभिवादन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. मैत्री दिनानिमित्त बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना झालं गेलं विसरून जा, असं म्हणत अप्रत्यक्षपणे एकत्र येण्यासाठी साद घातल्याचे दिसते.
या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भरभरून कौतुक केले. मुख्यमंत्री पदावर येऊन अडीच महिने झाले असले तरी एवढ्या कमी काळात महत्वाचे, मोठे निर्णय त्यांनी घेतले. ‘छा जा रहें है, बदल भी छा जा राहे है,’ अशा शब्दात राज्यपालांनी मुख्यामंत्री शिंदेंची स्तुती केली.
मात्र यावेळी मैत्रीबाबत बोलताना क्षमा केल्याने वाद मिटतात, असं मुख्यमंत्री शिंदे बोलले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे मैत्रीचा हात त्यांनी पुढे केला, अशी चर्चा रंगली आहे. वास्तविक शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही सकारात्मक चर्चा झाल्याचे आतापर्यंत आढळले नाही.
महत्वाच्या बातम्या-
Corruption : भाजप मंत्र्याच्या कामगाराचा प्रताप! पगार १० हजार अन् राहतोय अडीच कोटीच्या घरात, सांभाळतोय ४ बायका
Congress : काॅंग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल; नाना पटोलेंना हटवून ‘या’ नेत्याला करणार प्रदेशाध्यक्ष
Shivajirao Adhalrao Patil : शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळरावांचा पत्ता कट? भाजप केंद्रीय मंत्र्यांच्या विधानाने टेंशन वाढले