धनुष्यबाण(Dhanushyban)शिवसेनेत बंडखोरी करून शिवसेनेचे ४० आमदार व १२ खासदार एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. शिवसेनेमध्येच दोन गट निर्माण झाले. शिंदे म्हणत आहे की मी अजूनही शिवसैनिक आहे. माझा पक्षही शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेनेचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे नेमकं कोणाचं याबाबत प्रश्न निर्माण झाला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाचं ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह राहणार की नाही हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आता याबाबत ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिंदे गटाविरोधातील ठाकरेंच्या या याचिकेवर सुनावणीचा महत्त्वाचा निर्णय सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी घेतला आहे.
या याचिकेवर सरन्यायाधीश रमण्णा यांच्याच खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. महत्वाचं आणि विशेष म्हणजे या याचिकेच्या सुनावणीबाबत मत नोंदवताना सरन्यायाधीश रमण्णा यांनी “आम्हाला निर्णय द्यावाच लागेल,” असंही सांगितलं आहे. विद्यमान सरन्यायाधीश रमण्णा २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. अशातच देशाच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या या याचिकेवरील सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
सरन्यायाधीश रमण्णा यांनी आतापर्यंत या प्रकरणात घटना आणि कायद्यांवर बोट ठेवून कठोर निरीक्षणं नोंदवली होती. विशेष म्हणजे रमण्णा यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून दाखल याचिका घटनापीठाकडे वर्ग करण्याची आवश्यकता आहे का? यावरही विचार करत असल्याचं सूचक वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे याबाबत ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अंतर्गत वाद सुरू आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. उद्धव ठाकरे गटाने बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबतच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. मात्र, यावर सुनावणी होण्यास खूप प्रतीक्षा करावी लागत आहे. याप्रकरणी ८ ऑगस्टला यावर सुनावणी होणार होती, पण काही कारणास्तव ही सुनावणी लांबल्या गेली. समोरील १२ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे १२ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आणखी आता पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर गेली आहे. पुढील सुनावणी २२ ऑगस्टला होणार आहे. ही सुनावणी १० दिवसांनी लांबवणीवर पडली आहे. ठाकरे आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षादरम्यान आलेली ही सर्वात मोठी बातमी समजली जात आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. यांच्याच घटनापीठासमोर ही सुनावणी सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
Ration Card: राशन कार्ड धारकांनो, लक्ष द्या! जर तीन महिने ‘हे’ काम केलं नाही तर कार्ड होणार रद्द, वाचा सविस्तर..
Netaji: वडील स्वतंत्र भारत पाहू शकले नाहीत पण कमीत कमी.., नेताजींच्या मुलीची सरकारकडे मागणी
politics: घरात बायको जेवढी फुगत नसेल तेवढे मंत्री फुगत आहेत, सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांना टोला
Milk : सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक फटका; अमुल, मदर डेअरीने दुधाच्या किंमती वाढवल्या