Share

‘रसोडे में कौन था’ गाण्यानंतर ‘छोरी पटाता है’ गाण्याने घातला धुमाकूळ, पहा ८२ लाख लोकांनी पाहिलेला व्हिडीओ

गायक यशराज मुखाटे यांनी रिमिक्स केलेले ‘रसोड़े में कौन था’ (Rasode Main Kon Tha) आणि ‘पावरी हो रही है’ (Pawri ho rahi hai) हे गाणे तुम्हाला आठवत असेलच. ही गाणी पाहता-पाहता सोशल मीडियाच्या जगात ट्रेंड म्हणून पोहोचली होती. आता अशाच एका डायलॉगचे रिमिक्स व्हर्जन ‘खाली छोरी पटाता है’ ने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे.(Chhori Patata Hai is a song that drives people crazy)

हे गाणं संगीतकार आणि YouTuber मयूर जुमानी यांनी तयार केले आहे. आत्तापर्यंत हा व्हिडिओ 82 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हायरल व्हिडिओ पुन्हा-पुन्हा पाहण्यास लोक पसंत करत आहेत. यासोबतच ते गाण्याची खूप मज्जाही घेत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पत्रकाराच्या प्रश्नांवर एक व्यक्ती विद्यार्थ्यांची तक्रार करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये दिसणारे भाऊ बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे, जे वारंवार विद्यार्थ्यांबद्दल सांगतात की, ते ‘खाली छोरी पटाता है’. ही व्यक्ती पुन्हा पुन्हा म्हणते, मला सांगा त्यांचा वाचनात लक्ष आहे का? या व्हिडिओमध्ये, इंटरनेटवर खळबळ माजवणाऱ्या व्यक्तीच्या ‘खाली छोरी पटाता है’ या ओळीवर लक्ष केंद्रित करून एक मॅशअप तयार करण्यात आला आहे.

इथे पाहू शकता ‘छोरी पटाता है’चे रिमिक्स व्हर्जन, हा व्हिडिओ त्यावेळचा सांगितला जात आहे जेव्हा कोरोना व्हायरसच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. हा व्हिडिओ इंटरनेटवर लोकांना खूप आवडला आहे आणि लोक याचा खूप आनंद घेत आहेत.

मयूर जुमानीने हा व्हिडिओ 1 मार्चला शेअर केला होता. यूट्यूबर मयूर जुमानीचा हा व्हिडिओ लोकांना किती आवडला आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, आतापर्यंत सुमारे 5 लाख लोकांनी याला लाईक केले आहे, तर व्हिडिओला 8.2 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय लोकांकडून यावर बिनधास्तपणे भाष्य केले जात आहे.

एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे, भाऊ, भारी मास्टरपीस बनवली आहे. त्याचवेळी आणखी एका युजरचे म्हणणे आहे की, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे हसू थांबत नाही आहे. त्याचप्रमाणे आणखी एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, मला ते पुन्हा पुन्हा बघायला आवडते. एकूणच, ‘छोरी पता है’च्या रिमिक्स व्हर्जनने लोकांना भुरळ पाडली आहे.

महत्वाच्या बातम्या-
तेव्हा लहाणपणी लग्न व्हायची तुमचं अजून झालं नाही, राज ठाकरेंचा कोश्यारींना टोला
राज्यपालांनी लोकशाहीचा गळा घोटला; आघाडी विरोधात कोर्टात जाणाऱ्या भाजपलाच कोर्टाने झापले
PHOTOS: या आहेत भोजपुरीच्या टॉप १० ग्लॅमरस अभिनेत्री; सनी लिओनी, नोरा फतेहीही पडतील फिक्या
सोनाक्षी नाही, तर ‘या’ अभिनेत्रीशी ठरलं होतं सलमानचं लग्न, पत्रिकाही छापल्या होत्या; पण पुढे

 

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now