Share

‘या’ अभिनेत्रीने कॅन्सरवर केली मात, सहा तास चालली शस्त्रक्रिया; म्हणाली, ‘प्रार्थना करणं बंद करू नका’

chhavi mittal

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री छवि मित्तल (chhavi mittal) सध्या कठिण काळातून जात आहे. छवीला स्तनांचा कर्करोग झाला असून नुकतीच काही दिवसांपूर्वी तिने याबाबत चाहत्यांना माहिती दिली होती. तर आता छवीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून यासंदर्भात तिने एका पोस्टद्वारे माहिती दिली आहे.

छवीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर रूग्णालयातील तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने एक मोठी पोस्ट शेअर करत तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती दिली आहे. छवीने लिहिले की, ‘जेव्हा डॉक्टरांनी मला भूल देताना डोळे बंद करण्यास सांगितले आणि वेगळा विचार करण्यास सांगितले होते तेव्हा मला माझ्या आरोग्यदायी आणि सुंदर ब्रेस्ट माझ्या डोळ्यासमोर आले. त्यानंतर मी आतमध्ये गेले’.

‘दुसरी गोष्ट म्हणजे मला माहित होतं की, आता मी कॅन्सर फ्री होऊनच बाहेर येणार. शस्त्रक्रिया पूर्ण सहा तास चालली. यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया करण्यात आल्या. आणि आता ते पूर्णपणे ठीक होण्यासाठी बराच वेळ लागेल. परंतु, चांगली गोष्ट ही आहे की, सर्वकाही ठीक होण्याच्या मार्गावर आहे. जो वाईट होता तो नष्ट झाला आहे’.

‘तुमच्या प्रार्थना पूर्णवेळ माझ्या डोक्यात होते. आणि आताही मला या प्रार्थनांची खूप गरज आहे. कारण आता मला खूप त्रास होत आहे. हा त्रास मला या गोष्टीची आठवण करून देते की, मी एक मोठी लढाई हसत हसत जिंकली आहे’.

छवीने पुढे म्हटले की, ‘मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगणार आहे. परंतु, या कठिण काळात माझ्यासोबत नेहमी राहण्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. तुमच्या संदेशांनी माझ्या डोळ्यात पाणी आणलं. तुम्ही सर्वजण कृपया माझ्यासाठी प्रार्थना करणे बंद करू नका’.

‘शेवटी आणि महत्त्वाचे. मी हे सर्व काही माझ्या जोडीदाराशिवाय करू शकले नसते. माझा जोडीदार जो माझ्यासारखा वेडा, माझ्याइतकाच खंबीर, माझ्याप्रमाणेच शूर, धैर्यवान, काळजी घेणारा आणि प्रेमळ आहे. मोहित हुसैन आता मी तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू पाहू इच्छित नाही’. यासोबत छवीने शेवटी #cancerfree हा हॅशटॅग वापरला आहे.

दरम्यान, छवीने यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याच्या एक दिवसाअगोदरचा होता. या व्हिडिओत छवी डान्स करताना दिसून आली. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टरांनी छवीला रिलॅक्स राहण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठी आणि रिलॅक्स राहण्यासाठी डान्स करत असल्याचे तिने पोस्टमध्ये सांगितले होते.

महत्त्वाच्या बातम्या :
कंगनाचे लहानपणी झाले होते लैंगिक शोषण; स्वत:च खुलासा करत म्हणाली, एक मुलगा मला वाईट पद्धतीने..
‘हा’ व्यक्ती बनवणार सलमान खानला मोठा नेता, आता सलमान खान करणार राजकारण?
VIDEO : ‘या’ कारणामुळे सलमानच्या हातात सतत असते ‘ते’ लकी ब्रेसलेट, स्वत: सलमानने सांगितला किस्सा

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now