Share

‘औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

औरंगाबादच्या विमानतळाचे ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामकरण करावे, असा ठराव विधिमंडळात एकमताने मंजूर करून तो दिल्ली दरबारी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाचे पुढे काय झाले, अशी विचारणा दिल्लीला करण्याची वेळ आली आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी शहराच्या नामांतरावर प्रश्न विचारणाऱ्या भाजपला लगावला. (Chhatrapati Sambhaji Maharaj to name the airport in Aurangabad; Announcement of Uddhav Thackeray)

औरंगाबादमधील संत एकनाथ महाराज रंगमंदिर नाट्यगृहाच्या  नूतनीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले असून नुकताच त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवत उपस्थितांसह महाराष्ट्राला यावेळी त्यांनी संबोधित केले. यावेळी औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘तेथील निवडणूकीत शिवसैनिकांनी कधीच निराश केलं नाही पुढेही करणार नाहीत,’ असा विश्वासही दर्शवला. दरम्यान औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असून लवकरच केंद्राचा आदेश येईल अशी आशाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान, यावेळी बोलताना ठाकरे यांनी औरंगाबादमधील अनेक प्रश्न शिवसेने सोडवले असल्याचं सांगितलं. संभाजीनगर या नावाचा प्रश्न कायम असून येथील विमानतळाला मात्र छत्रपती संभाजीनगर विमानतळ नाव देण्याचा प्रस्ताव सर्वांनी मंजूर केला असून हा प्रस्ताव सध्या केंद्र दरबारी असून तो लवकर मान्य होईल अशी आशा व्यक्त करत विमानतळाच्या बारसं करायला मिळेलं असंही ते म्हणाले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुखांच्या औरंगाबादच्या सभांना मैदाने कमी पडायची. जनतेला अनेक आश्‍वासने दिलेली आहेत. शिवसेनेने त्यावर विश्‍वास ठेवून महापालिकेतील भगवा जनतेने उतरू दिला नाही आणि उतरणार नाही. पण जनतेला दिलेल्या आश्‍वासनांचा शिवसेना विसर पडलेला नसल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना सांगितले.

“बरेच दिवस मी संभाजीनगरमध्ये येऊ शकलेले नाही. पण ही उणिव मी भरून काढल्याशिवाय राहणार नाही. लवकरात लवकर मी तमाम संभाजीनगरकरांच्या दर्शनासाठी आल्याशिवाय राहणार नाही. संभाजीनगरच्या रहिवाश्यांना दिलेली वचने बऱ्याच प्रमाणात पूर्ण केली आहेत. महानगरपालिकेवरचा भगवा संभाजीनगरकरांनी उतरू दिला नाही. हा मला आत्मविश्वास आहे. नाट्यगृहे, उद्याने यासारख्या गोष्टींकडे थोडेसे दुर्लक्ष होते. मनोरंजनाच्या ठिकाणांकडे नाही म्हटले तरी दुर्लक्ष होत आहे, असे ठाकरे म्हणाले.

‘जगताना या गोष्टी बाजूला ठेवल्या तर मग जगायचे कसे हेच आपल्याला कळणार नाही. आजचं संत एकनाथ महाराज रंगमंदिर नाट्यगृहाचे रुप बदलेले आहे. संभाजीनगरच्या लोकांसाठी या नाट्यगृहाचे लोकार्पण झालेले आहे. संभाजीनगरकरांना जसा पूर्वी आनंद मिळत होतो तसाच आत्ताही मिळेल असा मला आत्मविश्वास आहे,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
मध्यरात्री व्यायाम करत होता मुलगा म्हणून आई ओरडली; संतापलेल्या मुलाने आईसोबत केलं ‘हे’ भयानक कृत्य
अक्षय कुमारने घेतला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा अलिशान फ्लॅट, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील
पाकिस्तान मध्ये भ्रष्टाचाराने गाठला उच्चांक; करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये भारतालाही टाकले मागे..
डॉक्‍टरची पत्नी कुरिअर बाॅयच्या प्रेमात पडली, 2 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर, मुलगा धोका देऊन पळाला..

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now