Share

छगन भुजबळांकडून राज ठाकरेंच्या इतिहासाचा पंचनामा; ‘…तेव्हा टिळक 13 वर्षाचे होते’

chagan bhujbal
गुढीपाडवा मेळावा, नंतर ठाण्यात झालेली उत्तर सभा या दोन्हीही सभेप्रमानेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल औरंगाबादमध्ये देखील जोरदार सभा पार पडली. या सभेची गेल्या 10 दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर सभेला परवानगी मिळाली आणि सभा पार पडली.

या सभेकडे अवघ्या राज्याच लक्ष लागलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. यावरून आता राजकारण चांगलच तापलं आहे. याचाच धागा पकडत राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्याने राज ठाकरेंचे दावे खोडून काढले आहे.

‘ज्या वेळी फुलेंनी समाधी शोधली, त्यावेळी टिळक केवळ 13 वर्षांचे होते,’ असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. भुजबळांच्या या वक्तव्यावर आता मनसे कडून काय प्रतिक्रिया येतीये, हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.

तसेच पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शंभू राजेंनी बांधली. टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली, हे धादांत खोटं आहे. ज्या वेळी फुलेंनी समाधी शोधली, त्यावेळी टिळक केवळ 13 वर्षांचे होते, असं भुजबळांनी यावेळी बोलताना सांगितलं.

याबाबत बोलताना पुढे भुजबळ म्हणतात, ‘टिळकांनी शिवस्मारकासाठी केवळ फंड गोळा केला. मात्र त्यांनी उभ्या आयुष्यात काहीच केलं नाही. तसेच पुढे विचारणा झाल्यावर ज्या बँकेत फंड ठेवला होता, ती बँकच बुडाली असं सांगण्यात आलं, असा खळबळजनक दावाही भुजबळ यांनी केला.

दरम्यान, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. ‘लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसाठी एक विटही रचली नसल्याचे इंद्रजित सावंत यांनी सांगितले आहे. जो नेता आपल्या शेंड्यावर शिवाजी महाराज यांची राजमुद्रा व्यवस्थित छापत नाही, त्याकडून काय अपेक्षा करायची, असही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now