Share

इंजेक्शन घेऊन खेळतात भारताचे खेळाडू; अध्यक्षांच्या स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक खुलासे 

team india

भारतीय संघाचे माजी निवडकर्ते चेतन शर्मा यांनी केलेल्या खुलाश्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. भारतीय संघातील काही खेळाडू डोपिंग टेस्टपासून वाचण्यासाठी आणि स्वत:ला फिट दाखवण्यासाठी इंजेक्शन घेत असल्याचा दावा केला आहे.

भारतीय संघात खुप स्पर्धा आहे. त्यामुळे कोणाला संधी मिळते तर कोणाला मिळत नाही. भारतीय संघात जागा मिळालीच तर छोट्या दुखापतींमुळे चो संघातून बाहेर पडत नाही. त्यामुळे खेळाडू १०० टक्के स्वत:ला फिट दाखवण्यासाठी इंजेक्शन घेत असल्यादा दावा चेतन शर्मा यांनी केला आहे.

चेतन शर्मा हे आधी बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष होते. ते यावर बोलताना म्हणाले की, सर्वच खेळाडूंना स्टार व्हायचे असते. सर्वांनाच सुपरस्टार कोहली बनायचे असते. असे अनेक खेळाडू आहेत, जे म्हणतात मला खेळायचंय. पण संघात खुप स्पर्धा आहे.

खेळाडूंवर संघातील जागा जाण्याची भिती असते. त्यामुळे स्वत:ला फिट दाखवण्यासाठी काही खेळाडू इंजेक्शनही घेतात. पंत जखमी झाल्यानंतर इशान संघात आला. शिखर धवन तर बाहेरच गेला आहे. संजू सुद्धा यामुळे अडकला आहे. एका इशानने तीन खेळाडूंचे करिअर उद्ध्वस्त केले केले आहे. केएल किपींग करतो, इशान पण किपींग करतो मग पंतला संधी कशी मिळणार? असा प्रश्न चेतन शर्माने उपस्थित केला आहे.

भारतीय संघात कोणत्याही खेळाडूला आपली जागा सोडायची नाही. त्यांना माहिती आहे संघातून जागा गेली तर पुढील दोन वर्षे जागेसाठी वाट पाहावी लागेल. त्यामुळे ते इंजेक्शन घेताना दिसतात.  एका वृत्तवाहिनीने स्टींग ऑपरेशन केले आहे. त्यामध्ये चेतन शर्मा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

तसेच चेतन शर्मा यांनी जसप्रीत बुमराहबद्दल काही गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की, जसप्रीत बुमराहला संघात निवडता आले नाही, कारण त्याला मोठी दुखापत झाली होती. त्यावेळीच काही असे खेळाडू होते ज्यांनी इंजेक्शन घेतले होते. ते इंजेक्शन घेऊन असे म्हणत आहे की, ते खेळण्यासाठी योग्य आहे.

महत्वाच्या बातम्या-
चहा विकून बक्कळ पैसा कमवणाऱ्या प्रफुल्लने खरेदी केली मर्सिडिज कार, किंमत ऐकून बसेल धक्का
सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाने फेकला नवा ‘पत्ता’, शिवसेनेने ‘हे’ प्रत्यूत्तर देत काढली सगळी हवा
३०० वर्षे पाण्यात बुडाला होता १७ अब्ज डॉलर्सचा खजिना, सोन्याची चमक पाहून अख्ख जग झालं थक्क

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now