आयपीएल १५ मध्ये, डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातला सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. रोमहर्षक झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा ४ गडी राखून पराभव केला.
चेन्नईचे ७ गडी बाद झाल्यानंतर मुंबईने दिलेलं लक्ष्य साध्य केलं. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना १५५ धावा केल्या होत्या. १५६ धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर रुतुराज गायकवाड खाते न उघडताच माघारी परतला. त्याला सॅम्सने बाद केले.
ऋतुराज बाद झाल्यानंतर सँटनरने वेगवान धावा करण्याचा प्रयत्न केला पण तोही ९ चेंडूत ११ धावा करून बाद झाला. २ विकेट लवकर पडल्यानंतर उथप्पा आणि रायुडूने संघाची धुरा सांभाळली. यादरम्यान दोघांनी ५० धावांची भागीदारी केली. ही जोडी धोकादायक ठरत असताना त्यांची भागीदारी जयदेव उनाडकटने तोडली.
त्याने उथप्पाला २५ धावांवर बाद केले. उथप्पा बाद झाल्यानंतर दुबेही फार काही करू शकला नाही आणि १३ धावा करून बाद झाला. रायुडूनेही हत्यार टाकले आणि ४० धावा करून तो ही बाद झाला. रायुडू बाद झाल्यानंतर सर्व जबाबदारी धोनी आणि जडेजावर आली होती. मात्र, या दडपणाखाली जडेजाही फार काही करू शकला नाही आणि ३ धावा करून बाद झाला.
जडेजा बाद झाल्यानंतर ड्वेन प्रिटोरियस आणि धोनीने चेन्नईची धावसंख्या पुढे नेली. धोनीने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो जगातील एक नंबरचा फिनीशर आहे. सामना सांभाळत धोनीने शेवटच्या अटीतटीच्या वेळी धडाकेबाज फलंदाजी केली आणि चेन्नईला विजय मिळवून दिला. चेन्नईने टॉस जिंकल्यानंतर मुंबईला फलंदाजीचे आव्हान दिले होते.
मुंबईकडून तिलक वर्मा (५१)* आणि सूर्यकुमार यादव (३२) यांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे आयपीएल २०२२ च्या ३३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला १५६ धावांचे लक्ष्य दिले होते. मुंबईने २० षटकांत ७ गडी गमावून १५५ धावा केल्या होत्या . चेन्नईकडून मुकेश चौधरीने तीन बळी घेतले. त्याचवेळी ड्वेन ब्राव्होने दोन, तर महेश थिक्शाना आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या मुलीचे नाव आले समोर, संस्कृत आणि ख्रिश्चन संस्कृतीचे मिश्रण g
ज्या दिवशी मुसलमान रस्त्यावर उतरेल तो दिवस तुम्हाला.., मौलाना तौकिर रजा यांचे वादग्रस्त वक्तव्य
हे सर्व सहनशीलतेच्या पलिकडे, आता मी पुढचं पाऊल उचलणार; रेणू शर्माच्या अटकेनंतर मुंडे कडाडले
हे सर्व सहनशीलतेच्या पलिकडे, आता मी पुढचं पाऊल उचलणार; रेणू शर्माच्या अटकेनंतर मुंडे कडाडले