Share

The Kapil Sharma Show: ‘द कपिल शर्मा शो’मधील चंदू चायवाल्याचे चमकले नशीब, ‘या’ वेब सिरीजमधून करणार पदार्पण

Chandan Prabhakar, The Kapil Sharma Show, Web Series, OTT/ छोट्या पडद्यावरील सुपरहिट कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शोमधील प्रत्येक पात्र हे खूप खास आणि महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमातील सर्व कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यापैकी एक म्हणजे चंदन प्रभाकर (Chandan Prabhakar) होय.

शोमध्ये चंदू चायवाल्याची भूमिका साकारून करोडो प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या चंदनला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही. आता बातमी येत आहे की त्याच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर चंदन ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. चंदन एका वेब सीरिजद्वारे फिल्मी दुनियेत प्रवेश करणार आहे.

कॉमेडियन म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारा चंदन प्रभाकर आता अभिनय विश्वात आपला ठसा उमटवताना दिसणार आहे. नुकतेच प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत. चंदनच्या या वेबसीरीजची चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत.

लंकी हंसराज दिग्दर्शित कॉमेडी वेब सीरिजमध्ये चंदन प्रभाकर दिसणार आहे. चंदूच्या या पदार्पणाच्या ओटीटी वेबसीरीजचे नाव अद्याप ठरलेले नाही. मात्र लवकरच चंदन प्रभाकर अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

ही बातमी समोर येताच चाहते प्रचंड उत्साहित झाले आहेत. चंदन हा ‘द कपिल शर्मा शो’चा महत्त्वाचा भाग आहे. त्याचे चंदू चायवालाचे पात्र लोकांना खूप आवडते. या शोच्या माध्यमातून तो एका रात्रीत छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकारांच्या यादीत सामील झाला.

द कपिल शर्मा शोमध्ये आपल्या कॉमेडीच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या चंदन प्रभाकरची कथा संघर्षाची आहे. चंदन प्रभाकर प्रसिद्ध टीव्ही शो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज 3’ मध्ये उपविजेता ठरला. मात्र, असे असूनही चंदनने कामाच्या शोधात बरेच चढ-उतार पाहिले. पण द कपिल शर्मा शोनंतर चंदन प्रभाकरचे नशीब चमकले.

महत्वाच्या बातम्या-
Kapil Sharma: ..तेव्हा कपिलच्या कानाखाली मारून त्याला सेटवरून हाकलून दिले होते, डायरेक्टरचा खुलासा
VIDEO: कपिल शर्मा शोची जागा घेणार हा नवीन शो, पुर्ण टीमने नाचत-गाजत चाहत्यांना केले अलविदा
विचित्र अवस्थेत रस्त्यावर फिरताना दिसला द कपिल शर्मा शो मधील कॉमेडियन, व्हिडीओ झाला व्हायरल
या मित्रामुळे सलमान खान झाला बदनाम; स्वत:च खुलासा करत म्हणाला, त्याने माझी इमेजच अशी बनवली

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now