Share

‘…तर आम्ही घरदार विकून काश्मीर फाइल्स लोकांना दाखवू’, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

chandrkant oatil

सध्या ‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा चित्रपट आधारित आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चित्रपटाचे विशेष कौतुक केले आहे.(chandrkant patil on kashmir files conterversy)

या चित्रपटाच्या निमित्ताने दोन गट पडले आहेत. एक गट चित्रपटाच्या बाजूने आहे, तर दुसरा गट चित्रपटाच्या विरोधात आहे. काही राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. पण पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आलेला नाही. यावर देखील राजकीय पक्षांमध्ये वाद सुरु आहे. या वादावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, “द कश्मीर फाइल्स चित्रपटामध्ये दाखवलेली जी परिस्थिती, जे भयाण चित्र आहे, ते वस्तुस्थिती नाही का? हे एकदा मान्य करा. काश्मीर मधला हिंदू माणूस पळून गेला नाही का? काश्मीर मधल्या महिलांवर बलात्कार झाले नाहीत का? तिथल्या पंडितांच्या प्रॉपर्टी हडप नाही केल्या का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

“तुम्ही काश्मीर फाइल्स टॅक्स फ्री करणार नसाल, तर आम्ही घरदार विकून तो लोकांना दाखवू”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात होळी साजरी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात घोषणा दिल्या. त्यावर भाजप पक्षाने देखील होळी साजरी करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.

यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “सगळ्या वाईट प्रवृती जाळण्याच प्रतीक म्हणजे होळी आहे. हे सरकार सामान्य माणसावर अन्याय करत आहे. या सरकारकडे आमदारांचा निधी वाढवण्यासाठी, त्यांच्या ड्रॉयव्हरचा पगार वाढवण्यासाठी पैसे आहेत. मात्र शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत.”

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “एसटी कामगारांचा विषय सुटत नाही, महिलांवरील अत्याचार कमी होत नाहीत, त्यामुळे या सर्व वाईट प्रवृत्तीची होळी आज पुण्यातील भाजप कार्यालय इथे करण्यात आली आहे”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. यावर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-
दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर लोकांनी जवानांवर केली दगडफेक, पोलिसांनी १५ जणांना घेतलं ताब्यात
भारताला प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसला, मिसाइल टेस्टिंगदरम्यान घडलं असं काही की..
भारतात ह्युंदाई लॉन्च करणार ‘ही’ मिनी एसयूव्ही, टाटा पंचला देणार टक्कर, वाचा किंमत आणि फिचर्स

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now