बच्चू कडू शिंदे गटावर नाराज असल्याचीही चर्चा होती. अशा वेळी बच्चू कडू ठाकरेंना साथ देतील, असा दावा करून चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडूंना मंत्री बनवतील अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना होती पण त्यांची निराशा झाली.
बच्चू कडू माझा चांगला मित्र आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे दिव्यांगांसाठी मंत्रालय मिळाले, ही आनंदाची बाब आहे. त्यानिमित्त मी त्यांचे अभिनंदन करतो. शेतकरी, दिव्यांग बंधू-भगिनींसाठी लढणारा नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. सर्वसामान्यांना मदत करणारा तो नेता आहे. असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचे त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांचेही उद्धवसाहेबांवर प्रेम आहे. बच्चू कडू उद्धव ठाकरे यांनाच पाठिंबा देणार असल्याचा दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने बच्चू चांगलेच नाराज आहेत. विस्तारादरम्यान स्थान मिळेल, अशी आशा त्यांना आहे.
नेमंक काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
चंद्रकांत खैरे म्हणाले की, “बच्चू कडू हे माझे खूप चांगले मित्र आहेत. त्यांचे कामही खूप छान आहे. त्यांना अपंगांचे खूप आशीर्वाद मिळतील. पण ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले तर मला नक्कीच आवडेल.”
त्यांना एकत्र कसे आणायचे? याला उत्तर देताना खैरे म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि बच्चू कडू यांचे एकमेकांवर प्रेम आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची थेट चर्चा झाली आहे. ते त्यांच्याकडे जाऊनही बोलतील…” अस म्हणताना दुसरीकडे चंद्रकांत खैरे यांनी बच्चू कडू यांच्या टीकेला प्रत्युत्तरही दिले.
चंद्रकांत खैरे मोकळे आहेत, त्यांच्याकडे एकही काम शिल्लक नाही, असे बच्चू कडू म्हणाले होते. त्यावर चंद्रकांत खैरे म्हणाले, बच्चू भाई, आमच्या संभाजीनगर जिल्ह्यातील 5 आमदारांनी शिवसेनेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. जनतेची खूप कामे आहेत. संघटनेचे खूप काम आहे. मी कामात खूप व्यस्त आहे.”
राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाला मंजूरी देण्यात आली आहे. हे देशातील अशा प्रकारचं पहिलंच मंत्रालय आहे. आपण कुणासाठी काम केलं पाहिजे? असा संदेश यातून देण्यात आला आहे. ज्यादिवशी अर्थसंकल्पाचं पहिलं पान दिव्यांगांसाठी, विधवा महिलांसाठी, शेतकरी, मजूरांसाठी आणि वंचितांसाठी लिहिलं जाईल, तेव्हा देशाचं बजेट सर्वात सुंदर असेल, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
मला वाटतं की मंत्रिपद न मिळाल्याचं दु:ख आता मी विसरुन गेलो आहे. नवीन सुखाची पाऊलवाट आता सुरु झाली आहे. दिव्यांग मंत्रालयाला आता मंजूरी मिळाली आहे. मला आत्मविश्वास आहे की, दिव्यांग मंत्रालयाचा पहिला मंत्री बच्चू कडूच असेल, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, मंत्रिपद चुलीत घाला. तुम्ही फिरुन त्याच मुद्यावर येतात. माझ्यासाठी मंत्रिपद फार महत्वाचं नाही. मंत्री तर मी होणारच आहे. कारण एकनाथ शिंदेंनी मला शब्द दिला आहे. पण आधी सेवा करु. दिव्यांगाच्या शेवटच्या घरापर्यंत पोहचू.
महत्वाच्या बातम्या-
ravish kumar : रवीश कुमार एनडीटीव्हीमधून पडले बाहेर, बुधवारी तडकाफडकी दिला राजीनामा
School : ८-९ वीत शिकणाऱ्या मुलांच्या बॅगेत सापडले कंडोम, सिगारेट आणि दारु; देशभरात उडाली खळबळ
Aftab statement : ‘मला फाशी झाली तरी पश्चाताप नाही, स्वर्गात मिळतील अप्सरा’; आफताबचे धक्कादायक विधान