आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrkant Khaire) यांनी भाषण केले. या भाषणात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे.(chandrkant khaire comment on kirit somiya )
“उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तर थोबाड लाल करू”, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना दिला आहे. या सभेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, “कुणीही उठतं मुख्यमंत्र्यांबाबत बोलतं. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबाबत बोलतं. आम्ही ते सहन करणार नाही. फालतू शक्ती कपूर उठसुठ मुख्यमंत्र्यांबाबत बोलतो.”
“इथून पुढे मुख्यमंत्र्यांबाबत किंवा शिवसेनेबाबत अवाक्षर काढलं तर आम्ही त्याचं थोबाड लाल केल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांबद्दल अरे-तुरे बोलतो. त्याला सांगा, संभाजीनगरला ये… तुला दाखवतो”, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे भाषणात म्हणाले आहेत. आज औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.
“ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते”, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. “जो देशासाठी मरायला तयार असतो तो कोणत्याही धर्माचा असला तरी तो आमचा आहे. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुस्लिम लोकांचा द्वेष करायला शिकवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा आदर केला”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभेत म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभेत पुढे म्हणाले की, “२५ वर्षे जे आमच्या मांडीवर बसलेले होते, तेच आता आमच्या छाताडावर बसलेले आहे, जे मित्र होते, ते वैरी झाले आहे, जे वैरी होते ते मित्र झाले आहेत”, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. २५-३० वर्षे तुम्ही आमचा उपयोग करून घेतला. आता सत्ता आल्यावर शिवसेना तुम्हालाच खुपायला लागली, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावले आहे.
नामर्दांच हिंदुत्व आम्हाला शिकवू नका. मर्द असाल तर आधी काश्मिरी पंडितांची रक्षा करा. बाळासाहेब नसते तर तुम्ही दिल्ली काबीज केली असती का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी या सभेत उपस्थित केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे. “या शहराचे नामांतर मी करणार आहे, पण संभाजी महाराजांनी देखील आदर्श वाटेल असे नगर मी करणार आहे”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
ईशा गुप्ताचे बोल्ड फोटो पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचं झालं पाणी पाणी, ओलांडल्या सर्व मर्यादा
तो संत होता, २४ किमी शाळेत सायकलने जायचा, त्याला मी कधी पैसेही दिले नाही; मुसावालाचे वडील भावूक
हरिवंशराय बच्चन यांनी जया-अमिताभसमोर ठेवली होती ‘ही’ अट, त्यानंतर झाले दोघांचे लग्न, पहा फोटो