Chandrashekhar Bawankule : राज्यातील सत्तांतरणानंतर सर्वांचे लक्ष आता लोकसभा निवडणुकीवर लागलेले आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आलेली आहे. तसेच भाजप आणि शिंदे गटाने युती करत यापुढील निवडणूक सोबत लढवण्याचा निर्णयही घेतला आहे.
पक्षसंघटना वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यभर दौरेदेखील सुरु आहेत. तसेच भाजप २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी १६ मतदारसंघांवर लक्ष ठेवून आहे. त्यासाठी बारामती आणि कल्याण मतदारसंघात विशेष तयारी सुरु आहे.
यासंदर्भात मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल सूर्या याठिकाणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरातील प्रसारमाध्यमांच्या प्रमुख लोकांची बैठक घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कल्याण मतदारसंघाकरिता केवळ शिंदे गटावर अवलंबून राहणे चालणार नाही. शिंदे गट कमी पडला तर भाजपची ताकद पाहिजे असल्याचे ते म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीतून “लोकसभा प्रवास योजना” सुरु करण्यात आली असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. या योजनेच्या माध्यमातून भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांवर प्रत्येक राज्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रातील १६ मंत्र्यांची निवड महाराष्ट्रासाठी करण्यात आलेली आहे.
निवडलेले हे मंत्री येत्या दीड वर्षात दर तीन महिन्यांनी प्रत्येक मतदारसंघाला सहा वेळा भेटी देणार आहे. या भेटीदरम्यान ते तिथल्या केंद्राच्या योजना आणि कामकाज याचा आढावाही घेणार आहेत. या सगळ्यातून लोकसभेच्या राज्यातील सर्व जागा जिंकण्यावर भर देण्यात आला आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.
तसेच शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन दोन महिने उलटून गेल्यानंतरही अजूनपर्यंत जिल्ह्याला पालकमंत्री भेटलेले नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली असून लवकरच हा निर्णय घेण्यात येईल.
यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रमुखांसोबतच आमदार देवयानी फरांदे, आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, लक्ष्मण सावजी इत्यादी मंडळी उपस्थित होती. तसेच यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
Snakebite : झोपेत साप चावल्याने एकाच घरातील दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
T20 world cup : अखेर BCCI ने जाहीर केला टी-२० साठी भारतीय संघ; वाचा कोणत्या खेळाडूला मिळाली संधी
..तर उदय सामंतांना जिवंत जाळू, नाना पटोलोंसमोरच कार्यकर्त्याची जाहीर धमकी
VIDEO : Sharad Ponkshe : समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं काय? शरद पोंक्षे म्हणाले…