Amit Shah : बुधवारी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांवर प्रचंड टीका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.
दुसरीकडे दसरा मेळावा पार पडताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या दोन बड्या नेत्यांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच या भेटीबाबत अनेक तर्कवितर्कही लावण्यात येत आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांनी दिल्ली येथे गुरुवारी अमित शहांची भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Met Hon'ble Home Minister @AmitShah ji at New Delhi. On this occasion, Mumbai BJP President Shri Ashish Ji Shelar was also present. pic.twitter.com/8EPVwl9yZH
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) October 6, 2022
येत्या काळात महापालिका निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यादृष्टीने ही भेट महत्वाची मानली जात आहे. यासोबतच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. सत्तांतरानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी अमित शहांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. ३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक होणार असून ६ नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या निवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांना तर शिवसेनेकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाबाबत ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरु आहे. धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे असणार याबाबतचा निर्णय अद्याप लागलेला नाही.
महत्वाच्या बातम्या
Arun Bali: बॉलिवूडला हादरले! थ्री इडियट्स मधील फेमस अभिनेत्याचे अचानक निधन
Prakash Ambedkar : “बाळासाहेब ठाकरेंमध्ये असलेला दिलदारपणा नरेंद्र मोदींमध्ये नाही”
Shinde group : दसरा मेळाव्याला निघालेल्या शिवसैनिकाचा रस्त्यातच हार्टॲटॅकने मृत्यू; अखेरचा निरोपही भगव्या शालीतच
Shinde group : “एक दुखावलेला बाप हात जोडून सांगतोय…”, मुलावरची टिका जिव्हारी लागलेल्या शिंदेंचं ठाकरेंना पत्र