Share

“मी लढलो नाही, माझा हिमालयात जाण्याचा प्रश्न नाही” कोल्हापूर उत्तर निवडणुकीच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

chandrkant patil

यावर्षीच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारत भाजपला धूळ चारली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी सर्वकाही पणाला लावणाऱ्या भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी चंद्रकांत पाटलांनी म्हणले आहे की, “कोल्हापूरची पोटनिवडणूक तीन पक्ष विरुद्ध एक पक्ष अशी लढत राहिली. आम्ही एकट्याने 77 हजार मतं क्रॉस केली, तोंडाला फेस आणला . निवडणूक असते हार जीत ही होत असते. नागरिकांनी दिलेला मतदारांचा कौल आम्ही मान्य करतो. सत्यजित कदम लढले तर फेस आला मी लढलो असतो तर काय झालं असतं.

मी लढलो नाही, त्यामुळे मला हिमालयात जाण्याचा प्रश्न नाही.” तसेच पुढे त्यांनी सांगितले, “आम्ही प्रयत्न करण्यात कुठं कमी पडलो नाही. पैशाचा, दंडुकेशाही आणि जातीचा वापर केला गेला. माझ्या अंगावर येण्यास देखील हे मागे राहिले नाहीत. आम्ही या निवडणुकीचं विश्लेषण करू. आम्ही ही निवडणूक विकासावर लढलो. बंटी पाटील म्हणतात की ही निवडणूक धर्मावर नेली.

हिंदुत्व हा आमचा अजेंडा नाही श्वास आहे, राजकीय आवश्यकता म्हणून हिंदुत्व वापरत नाही. हिंदु धर्मामध्येच सर्वधर्मसमभाव आहे . दुसऱ्या धर्माबद्दल आदर हा हिंदुंनी केला.” यासोबतच, ज्या झाडाला चांगले आंबे असतात त्या झाडालाच दगड मारले जातात. कोण म्हणतं कोथरूडला परत या, कोण म्हणतं हिमालयातून परत या, माझ्यावर किती लोक प्रेम करतात पाहा असे पाटलांनी माध्यमांशी बोलताना म्हणले.

इतकेच नव्हे तर, “या निवडणुकीत आमचा मुद्दा हा विकासाचाच होता. तुम्ही ५० वर्षात काय केले हे मांडा असे आम्ही म्हणत होतो. आम्हाला राज्यात पाच वर्षे आणि केंद्रात सात वर्षे मिळाली. आम्ही आतापर्यंत काय केले आणि पुढे काय करणार आहोत ते मुद्दे मांडले,” असे चंद्रकांत पाटलांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या
ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानेच केला सौदा; 3 वर्षांपासून तरुणी भोगत राहिली नरक यातना, अखेर झाली सुटका
‘तुम्ही CM किंवा PM नाहीत, मी स्वतः ताफा आडवेल’ मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याने राज ठाकरेंना दिलं ओपन चॅलेंज
आलिया-रणबीरने लग्नात घेतले फक्त ६ वचन, ७ वे वचन घेताना महेश भट्टने रोखले, पंडितालाही झापले
‘महावितरणाला कर्ज देऊ नका, असं पत्र केंद्राने बँकांना लिहिलं आहे’- नितीन राऊतांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now