Chandrakant Patil : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्मृतिचिन्हाच्या अनावरणाचा कार्यक्रम पुण्यात पार पडला. या कार्यक्रमासाठी भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी त्यांच्या ‘पाटील’ या आडनावाबद्दलचा एक किस्सा सांगितला.
आपल्या घरात सातत्याने पोलीस पाटील हे पद राहिले असल्याने आपले पाटील हे आडनाव पडले असल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी हा किस्सा सांगितला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आजही माझा सख्खा चुलत भाऊ माझ्या गावचा पोलीस पाटील आहे. ज्यावेळी मी माझ्या वडिलांना आपलं आडनाव काय असं विचारायचो, त्यावेळी ते सांगायचे की, आपण जावळीतले मोरे. यावर मी त्यांना विचारले की आपण पाटील कसे झालो?
तेव्हा त्यांनी सांगितलं की, आपल्या घरात सातत्याने पोलीस पाटीलकी राहीली, त्यामुळे आपण पाटील झालो असे, त्यांनी मला सांगितले. त्यामुळे याची भूमिका काय असते हे मी प्रत्यक्षाने जवळून पाहत आणि अनुभवत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पुढे बोलताना, येत्या काळात २० हजार पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यामुळे पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुणांसाठी ही आंनदाची बातमी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यावेळी कोरोना काळात निधन झालेल्या पोलिसांच्या कुटुंबाला मदत निधीचे वाटपही करण्यात आले.
तसेच पोलीस कॉर्टरची दयनीय अवस्था झाली असल्याने त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी जेष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचे कौतुक करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमात आर. के. लक्ष्मण यांची कन्या उषा लक्ष्मण यासुद्धा उपस्थित होत्या.
महत्वाच्या बातम्या
एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रस्ताव आल्यास विचार केला जाईल; चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं
फटके खाल्याशिवाय शिवसेनेला शहाणपण येणार नाही; चंद्रकांत पाटील
पंकजा मुंडेंची उमेदवारी नाकारल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही खूप प्रयत्न केले पण…
संभाजीराजेंचं आव्हान मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून दाखवावं, मग कळेल कुणी खंजीर खुपसला- चंद्रकांत पाटील