Tanaji Sawant : राजकारणात एखाद्या व्यक्तीने वक्तव्य केल्यानंतर त्याच्या भूमिकेला समर्थन देणे अथवा न देणे हा त्या व्यक्तीशी समोरच्याचे संबंध कसे आहेत? यावर निश्चित होत असते. याप्रकारेच तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावर जे वक्तव्य केले. त्याबाबत भाजप माजी प्रदेशाध्यक्ष आणि शिंदे सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावंतांनी बाजू घेतली आहे.
तानाजी सावंत यांनी कोणते वक्तव्य केले की, त्याचा विपर्यास केला जातो. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ लावून तेच माध्यमांमध्ये चालवले जाते. बोलण्याचा विपर्यास केला जातो. कृपया हात जोडून माझी विनंती आहे की, तानाजी सावंत जे वक्तव्य करतात, त्याचा उठसूठ गैरसमज करून घेण्याची गरज नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुढे पाटील म्हणाले, ‘ग्रामीण आणि शहरी भागात भावना व्यक्त करण्याची शैली वेगळी असते. तानाजी सावंत यांनी एखादं वाक्य म्हटलं की, त्याची मोडतोड करून ते समोर आणले जाते. माझी विनंती आहे की असं केलं जाऊ नये.’
‘मराठा आरक्षणाचा संदर्भात पहिल्यांदाच निर्णय घेत देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. मात्र त्यानंतर ते रद्द झाले. पुढे अडीच वर्ष त्याबद्दल कोणीही. आंदोलन केले नाही, तिच्या काढण्याची भाषा केली नाही, असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता. पण त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असं बोलत चंद्रकांत पाटील यांनी तानाजी सावंत यांची पाठराखण केली.
शिंदे सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेल्या तानाजी सावंत यांना कायमच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सामान्य जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. आताही मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल त्यांनी विरोधकांवर केलेल्या टिकेमुळे महाराष्ट्रभरातून तानाजी सावंत यांच्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
त्यानंतर मात्र तानाजी सावंत यांनी जे काही मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मराठा समाजाची माफी मागितली आहे. ‘आमच्या या सरकारमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच, असे झाले नाही तर मी पदाचा राजीनामा देईल,’ असेही त्यांनी माध्यमांसमोर सांगितले.