राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात फोडाफोडीच्या राजकरणास सुरूवात झाली. पक्षांतर मोठ्या प्रमाणात झाली. भाजपचे जेष्ठ नेते म्हणून ओळख असणारे एकनाथ खडसे यांनी देखील भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल असल्याच जेष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र जळगावातील दोन्ही पक्षांमधील वातावरण पाहता महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे दिसून येते आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात विकास कामांच्या श्रेयावरून चांगलाच वाद पेटला आहे.
काहीच दिवसांपूर्वी पाटील यांनी राष्ट्रवादीला जबर धक्का देत शेकडो कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधले होते. त्यानंतर तर खडसे – पाटील यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला. अनेकदा यांच्यात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे. अशातच पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुक्ताई मंदिरातील 5 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या मुद्द्यावरुन पाटील यांनी खडसे यांच्यावर टीका केली आहे. याबाबत पाटील माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘खडसेंकडून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, सामान्य कुटुंबातील गरीब व्यक्ती आमदार झाल्याने खडसे वैफल्यग्रस्त झाले आहेत, असा सनसनाटी आरोप त्यांनी खडसे यांच्यावर केला. ते म्हणाले, ‘मीही महाविकास आघाडीचा एक घटक आहे आणि अशाप्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्याने माझ्यावर टीका करत महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार चालू आहे.’
दरम्यान, ‘खडसे यांच्याकडून मला वारंवार टार्गेट करुन त्रास देण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे मी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून वस्तुस्थिती सांगणार आहे, आता बस झाले त्रास सहन करणे, असेही पाटील म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी निधीच्या पाठपुरावा केल्याचे एक पत्र दाखवावे, आमदार खोटारडे आहेत करंटे आहेत, अशी टीका खडसे यांनी केली होती. पाटील हे खोटारडे असून आम्हीच या कामांचा पाठपुरावा केला होता, असंही खडसे म्हणाले होते. यावरून आता पाटील यांनी खडसे यांच्यावर निशाणा साधला.
म्हटताच्या बातम्या
सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या आमदारावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल; उडाली खळबळ
घटस्फोटाचं एक असं कारण समोर आलं आहे जे वाचून झालेत सगळेच हैराण; महिलेने पतीसोबत केलं असं काही…
पुन्हा एकदा पडळकरांचा गनिमी कावा यशस्वी; शरद पवारांना पुन्हा दिला जोराचा झटका
माधुरी आणि सिद्धार्थ मल्होत्राने केला रोमँटिक डान्स, व्हिडीओ पाहण्यापासून तुम्हीही स्वतःला रोखू शकणार नाही