Share

‘शिंदे गटातील 16 आमदार पुन्हा मूळ शिवसेनेत येणार’; एकनाथ शिंदेंचं टेंशन वाढलं

eknath shinde cm

शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे हे नेहमी आपल्या विधानांनी चर्चेत असतात. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून खैरे हे चांगलेच आक्रमक झाले असून आता त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच टेन्शन वाढवलं असल्याच पाहायला मिळत आहे.

औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना खैरे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदार आमच्या संपर्कात असल्याचं खैरे यांनी म्हंटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकच्या भुवया उंचावल्या आहेत.

वाचा नेमकं काय म्हणाले चंद्रकांत खैरे..?
शिंदे गटाला लक्ष करताना खैरे यांनी म्हंटलं आहे की, “एकनाथ शिंदे गटातील 16 आमदार आमच्या संपर्कात आहेत. कोर्टाचा निकाल लागला की हे आमदार पुन्हा आपल्या मूळ शिवसेनेत येणार आहेत”, असा दावा खळबळजनक दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

पुढे बोलताना खैरे यांनी गटातील शिवसेना आमदार आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांना धारेवर धरलं आहे. आज औरंगाबादच्या पैठणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. अशातच आता एक कथित ऑडिओ क्लीप व्हायरल होतं आहे. व्हायरल ऑडिओ क्लीपमधून सभेला येणाऱ्यांना पैसे देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याचाच धागा पकडत खैरे यांनी म्हंटलं आहे की, “भुमरेंनी त्यांना मिळालेल्या ५० खोक्यातून सभेसाठी पैसे वाटप केले आहेत,” असा आरोप खैरें यांनी केला आहे. पुढे बोलताना खैरें यांनी म्हंटलं आहे की, मागील वेळी शिंदे आले तेव्हा केवळ २५ खुर्च्या होत्या. त्यामुळे, शिंदे हे भुमरे यांना म्हणाले असतील की, हे काय लावलं आहे.’

यामुळेच मुख्यमंत्री शिंदेंचं मन जिंकण्यासाठी भुमरे यांनी पुन्हा शिंदे यांच्या सभेच आयोजन केलं असल्याच खैरे यांनी सांगितलं आहे. खैरें यांनी केलेल्या आरोपांवर अद्याप भुमरे यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये. राजकीय वर्तुळाचे लक्ष आता भुमरे यांच्या प्रतिक्रियेकडे लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : मनसे – शिंदे गट महापालिका निवडणूका एकत्र लढवणार?, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
Garba : आता गरब्याच्या ठिकाणी बिगरहिंदूंना प्रवेश नाही; लव्ह जिहाद थांबवण्यासाठी मोठा निर्णय
दाभोळकर हत्या तपासाबाबत कुटुंबीयांचे गंभीर आरोप, पोलिसांची पोलखोल करत केला ‘हा’ दावा
“यापुढे फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजेत”, बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदेंची उडाली झोप

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now