politics : शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरून शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे चांगलेच भडकल्याचे दिसले. चिडलेल्या चंद्रकांत खैरेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी ‘लोक आता त्यांना जोड्याने मारतील, असे रामदास कदम यांच्याविषयी बोलत असताना पायातील बूट काढला.
संतापलेले चंद्रकांत खैरे म्हणाले की, ‘रामदास कदम यांनी औरंगाबादचे पालकमंत्री असताना लोकांना त्रास दिला. परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांना सांभाळून घेतले. ज्या माणसाने खूप काही दिले. मंत्री केले. त्याबाबत जर हे असे वक्तव्य करत असतील तर कदमांचा मेंदू सोडला की काय?’ अशीच शंका मला येते, खैरे म्हणाले.
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात आले. त्याबाबत चंद्रकांत खैरे बोलत होते. ‘लोक आता त्यांना जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाहीत, असे टीकास्त्र यावेळी खैरेंनी शिंदे गटावर सोडले.
चंद्रकांत खैरे प्रतिनिधित्व करत असलेल्या औरंगाबादचे बहुतेक आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. त्याबाबतची खदखद अनेकदा चंद्रकांत खैरे यांच्या बोलण्यातून व्यक्त येते. मात्र आता रामदास कदम यांच्यावर चंद्रकांत खैरे चिडले आहेत. हेच त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसते.
रामदास कदम यांनी जेव्हा शिवसेनेला राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी माध्यमांसमोर बोलताना रामदास कदम रडले होते. पक्षाची ही अवस्था बघवत नाही, असं रामदास कदम म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा तेव्हा राजकीय वर्तुळात झाली होती.
शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा एक भाग असणारे रामदास कदम हे अशा प्रकारे पक्ष सोडतील, असे शिवसैनिकांना वाटले नव्हते. मात्र पुढील काळात शिंदे गट व शिवसेनेतील वाद अधिकच टोकाला जात आहेत. या गोष्टीची प्रचिती रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या वक्तव्यामुळे येते. त्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी संतापून पायातील जोडा काढत, यानंतर आता लोक त्यांना जोडे मारतील, असे टीकास्त्र रामदास कदम यांच्यावर सोडले आहे.
महत्वाच्या बातम्या-
uddhav thackeray : आमच्या अंगावर आल्यास कोथळा बाहेर काढू, गद्दारांची लक्तरं काढणार; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
shinde camp : माजी नगरसेवकाचा शिंदे गटात जाहीर प्रवेश, मात्र नाशिकला परतण्यापूर्वीच मोठा धक्का, वाचा नेमकं काय घडलंय?
ramdas kadam : अखेर रामदास कदमांनी रश्मी ठाकरेंबद्दलचं वादग्रस्त विधान मागे घेतलं; कबुली देतं म्हणाले…