शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे हे राज्याच्या राजकारणात चांगलेच सक्रिय असतात. याचबरोबर आगामी महानगर पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप – शिवसेनेमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगले आहे. अशातच खैरे यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केल्याने वातावरण तापलं आहे.
‘वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते याबाबत प्रसार माध्यमांशी बोलत होते. मात्र खैरे यांच्या या आरोपांवर अद्याप भाजप नेत्यांची प्रतिक्रिया आलेली नाहीये.
भाजपला लक्ष करताना पुढे खैरे म्हणतात, ‘तुम्ही किती कमवले, कुठून आले एवढे पैसे तुमच्याकडे. लोकसभा निवडणुकीत एक हजार कोटी रुपये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला भाजपने दिले होते,’ असा खळबळजनक आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.
याचबरोबर ‘उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक झाली. मात्र तरी देखील तिथे समाजवादी पार्टीच्या लोकांना फोडण्यासाठी कशाला पैसे दिले?,’ असा संतप्त सवाल चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला. तसेच ‘आले कुठून हे पैसे,’ पुढे असाही सवाल खैरे यांनी उपस्थित केल्याने आता राजकीय वातावरण तापलं आहे.
दरम्यान, पुढे बोलताना खैरे यांनी मनसेला देखील लक्ष केलं. औरंगाबाद येऊन मोठी सभा घेणारे ‘सी’ टीम म्हणून काम करतात, असा टोला त्यांनी मनसेला लगावला आहे. मनसेच्या सभेला भाजपकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप देखील खैरे यांनी केला.
दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्याने अशाच प्रकारचा आरोप प्रकाश आंबेडकर यांच्यावर केला होता. शिवसेना आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ‘निवडणुकीच्या काळात आंबेडकर यांनी एक हजार कोटी रुपये घेतले आणि हे पैसे घेऊन आंबेडकर हेलिकॅप्टरने सभास्थानी पोहोचू लागले. मग हेलिकॅप्टर आलं कुठून असा गंभीर आरोप बांगर यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या-
गडकरी पंतप्रधान असते तर रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता; ठाकरे सरकारमधील बड्या नेत्याचे वक्तव्य
“फडणवीससाहेब..! आम्ही युती सोबत नसतो, तर तुम्ही मुख्यमंत्री झाला असता का?”
भाजपा मंत्र्याने स्वत:लाच लोखंडी साखळीनं मारले; लोकांनी पैसे उडवले, वाचा नेमकं काय घडलं?