shinde group : चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू म्हणून चंपासिंह थापा यांची ओळख होती. मात्र आता थापा यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जातं आहे. थापा यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेला चांगलीच गळती लागल्याच पाहायला मिळत आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक देखील मोठ्या प्रमाणात शिंदे गटाला समर्थन देतं आहेत. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
असं असतानाचं अजूनही शिवसेनेला धक्के बसत आहे. गळती लागलेली शिवसेना सावरण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे हे जोमाने कामाला लागले आहेत. मात्र असं असलं तरी देखील अजूनही अनेकजण ठाकरेंची साथ सोडून जातं आहेत.
अशातच आज थापा यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. थापा हे आज ठाण्यामध्ये देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी बोलताना थापा यांनी शिंदे गटातील प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘पहिल्यापासून शिवसेनेची सेवा करत होतो आता एकनाथ शिंदे साहेबांसोबत सेवा करणार असल्याचं थापा यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.
कोण आहेत चंपासिंह थापा..?
अनेकांनी दसरा मेळाव्यासह अनेक जाहीर सभांमध्ये बाळासाहेबांच्या आसनामागे थापा विनम्रपणे उभे असल्याचं पाहिलं आहे. बाळासाहेब ठाकरेंना सभेदरम्यान पाणी देणं, नॅपकिन देणं, चालताना हात धरून आधार देणं ही जबाबदारी थापा अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत होते.