Share

चॅलेंज! फोटोत दडलेला ‘हा’ शब्द शोधला तर मानलं तुम्हाला; बघा सापडतोय का?

ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित फोटो फार चर्चेत येत आहेत. अनेकांना यातील कोडी सोडवण्यात वेगळीच मजा येत असते. याची योग्य उत्तरं शोधण्यात लोकांचा रस वाढला आहे, असाच एक ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये एका चेहऱ्याचा फोटो रेखाटला आहे, त्यात एक इंग्रजी अक्षरातील नाव देखील दडलेले आहे ते शोधण्यास सांगितले आहे.

The Sun वेबसाइटनुसार, Donut_Playz_7573 नावाच्या एका वापरकर्त्याने Reddit या सोशल मीडिया साईटवर हा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो म्हणजे ऑप्टिकल इल्युजनचं एक उत्तम उदाहरण आहे. प्रथम फोटो पाहिल्यावर तुम्हाला चष्मा लावलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसेल.

या फोटोमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचं नाक, तोंड, गळा दिसेल आणि डोळ्यांना लावलेला चष्मा देखील दिसेल. पण चित्रात एवढेच नाही. जर तुम्ही चित्राकडे बारकाईने पाहिले तर तुम्हाला या फोटोमध्ये एक इंग्रजी शब्दही लिहिलेला दिसेल. मात्र तो विशिष्ट कला वापरून दडवण्यात आला आहे.

तो दडलेला इंग्रजी शब्द तुमच्या नजरेस येतो का ते पहा. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध होत आहे. या फोटोला युजर्सने मजेशीर कमेंट करत आपली उत्तरं दिली आहेत. एका व्यक्तीनं म्हटलं आहे या फोटोत हॉलिवूड अभिनेता सिलवेस्टर स्टेलॉन दिसत आहे.

तर एका दुसऱ्या युजर्सने म्हटलं आहे की या फोटोत ‘लेअर’ (Lare) हा शब्द लपलेला आहे. काही युजर्सने याची उत्तर अतिशय चोख पद्धतीने दिली आहेत. या फोटोत कोणालाही ‘Lair’ हा शब्द सहजासहजी दिसणार नाही. मात्र, जर डाव्या बाजूने अगदी बारकाईने निरीक्षण केले तर दिसेल की, डोळे आणि नाक ‘L’ अक्षरानं बनलेले आहे.

पुढे नाकातील छिद्र आणि त्याच्या वरचा भाग हा ‘I’ पासून तयार झालेला आहे. तर दोन्ही ओठ मिळून ‘A’ अक्षर होतं. हनुवटीपासून घशापर्यंतचा भाग ‘R’ अक्षराच्या रूपात दिसतो. त्यामुळे तुम्हांला देखील या फोटो मध्ये ‘Lair’ अक्षर दिसले तर कंमेंट करून नक्की सांगा.

इतर मनोरंजन

Join WhatsApp

Join Now