Share

केंद्र सरकारची भन्नाट योजना; पत्नीच्या नावाने खाते खोलून मिळवा दरमहा ४५ हजार रुपये

केंद्र सरकारच्या अनेक अशा योजना आहेत, ज्या सर्वसामान्यांसाठी वरदान ठरत आहेत. या योजनांचा लाभ घेऊन अनेकांनी आपलं भावी जीवन सुधारलं आहे. अशाच एका भन्नाट योजनेबद्दल आम्ही तुम्हांला माहिती देणार आहोत, ज्यामुळे दरमहा तुम्हाला ४५ हजार मिळतील.

कोणी बचत करत असेल तर त्यासाठी आपल्याकडे अनेक बचत योजना आहेत. तसेच तुम्हाला वृद्धापकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी बचत करायची असेल, तर त्यासाठी देखील केंद्र सरकारच्या उत्तम योजना आहेत. या योजनांचा लाभ घेऊन तुम्ही पुढचं आयुष्य अधिक सुखकर बनवू शकता.

आता अशाच आणखी एका योजनेबद्दल आम्ही तुम्हांला माहिती देणार आहोत. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर गुंतवणूक करून दरमहा ४५ हजार मिळवू शकतात. यामध्ये, तुमचे नियमित उत्पन्न चालू राहील. म्हणजेच तुम्हाला नियमित पेन्शन मिळत राहील.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हांला सर्वात प्रथम NPS मध्ये खाते उघडावे लागेल. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर फक्त १००० रुपयांमध्ये NPS खाते उघडू शकता. NPS खाते वयाच्या ६० व्या वर्षी परिपक्व होते. नवीन नियमांनुसार, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पत्नीचे वय ६५ वर्षे होईपर्यंत NPS खाते चालवू शकता.

NPS मध्ये खाते उघडल्यावर तुमच्या पत्नीला ६० वर्षे पूर्ण झाल्यावर एकरकमी रक्कम मिळेल. यासोबतच पेन्शनच्या स्वरूपात दरमहा नियमित उत्पन्न मिळेल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला किंवा वार्षिक NPS खात्यात पैसे जमा करू शकता.

उदाहरण सांगायचे झाल्यास, जर तुमची पत्नी ३० वर्षांची असेल आणि तुम्ही तिच्या NPS खात्यात दरमहा ५ हजार रुपये गुंतवत असाल. जर त्याला वार्षिक गुंतवणुकीवर १० टक्के परतावा मिळत असेल तर वयाच्या ६० व्या वर्षी त्याच्या खात्यात एकूण १.१२ कोटी रुपये असतील. यातून त्यांना सुमारे ४५ लाख रुपये मिळतील.

आर्थिक इतर

Join WhatsApp

Join Now