Share

‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात मनसेने थोपटले दंड; मोदी सरकारला दिला ‘हा’ मोठा इशारा

केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात आता मनसेने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्र सरकारच्या या योजनेविरोधात मनसेने तीव्र आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे. यामुळे आता केंद्र सरकार आणि  मनसे पुन्हा एकदा आमनेसामने येणार असल्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या सांगली दौऱ्याच्या नियोजनासाठी मनसे प्रवक्ते आणि विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस गजानन काळे हे शनिवारी सांगलीत आले होते. यावेळी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक झाल्यानंतर काळे यांनी सविस्तरपणे माध्यमांशी संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना काळे यांनी ‘अग्निपथ’ योजनेवरून केंद्र सरकारला धारेवर धरले. यावेळी बोलताना काळे म्हणाले, ‘केंद्र सरकारने सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेवर पुन्हा विचार करावा आणि हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा लवकरच महाराष्ट्रामध्ये मनसेकडून आंदोलन उभे करावे लागेल, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.

लवकरच अग्निपथ योजनेवर राज ठाकरे आपली भूमिका जाहीर करतील, असेही गजानन काळे यावेळी बोलताना म्हणाले. “राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या अग्निपथ योजनेवर मनसे लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती काळे यांनी यावेळी दिली.

याचबरोबर ‘मुलांचे शोषण करणं आणि त्यांची सेवाभावी वृत्ती संपवणे हे कोणत्याच सरकारचे धोरण नसावे अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. याबाबत आता खुद्द नेते राज ठाकरे हेच पुढील धोरण ठरवतील, असे गजानन काळे यावेळी बोलताना म्हणाले. त्यामुळे आता मनसे नेहमी काय भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने लष्करात भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Yojana) देशातील अनेक भागांतून विरोध होताना दिसत आहे. याचे पडसाद देशभरात उमटले आहे. मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणासह विविध राज्यांमध्ये शुक्रवारी हिंसक निदर्शने करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या :-
चला हवा येऊ द्या नंतर आता भारत गणेशपुरे, सागर कारंडे ‘या’ हिंदी शोमध्येही झळकणार, चाहते उत्सुक
रेकाॅर्डब्रेक! पुण्यातील ‘या’ किर्तनकाराने सलग १२ तास किर्तन करत केला अनोखा विक्रम; वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद
फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे..! मुलाला धमकी आल्यावर वसंत मोरे खवळले

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now