Share

मोदी सरकारकडून महाराष्ट्रासाठी खास गिफ्ट; राज्यासाठी दिले ‘हे’ दोन मोठे प्रकल्प

शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मोठं – मोठे रोजगार देणारे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेले आहेत. यामुळे शिंदे – फडणवीस सरकारवर विरोधकांवर टीकेची झोड उठवली जातं आहे. महाराष्ट्रातून जाणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का जातोय? असा सवाल विरोधकांकडून केला जातं आहे.

फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. तब्बल 22 हजार कोटींचा हा एअरक्राफ्ट प्रकल्पही गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे.

अशातच आता महाराष्ट्रासाठी दिलासा देणारी एक बातमी समोर येतं आहे. मोदी सरकारकडून महाराष्ट्राला उद्योगांच गिफ्ट मिळालं आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी दोन प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

माध्यमांशी बोलताना राजीव चंद्रशेखर यांनी म्हंटलं आहे की, पुण्यात 1 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. इलेकट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDAC या दोन कंपनी पुण्यात गुंतवणूक करणार आहेत. यामुळे रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे.

याचबरोबर इलेकट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर ही कंपनी 600 कोटींची गुंतवणूक करणार आहे. तर CDAC ही कंपनी 1 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.  त्यामुळे एकूण 1 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक या दोन कंपनी पुण्यात करणार आहेत. यामुळे आता बेरोजगारी हटविण्यात मदत होणार असल्याच बोलल जातं आहे.

महत्वाच्या बातम्या  
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी… 
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई 
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर 
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now