आज गोरेगावातील मनसे शाखेचं (mns sakinaka) उद्घाटन करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. त्यानंतर एक लहानसा समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी शिवजयंती तिथीनुसारच का साजरी करायची? या मागचे कारण सांगितले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आपल्याकडे जेवढे सण येतात, ते आपण तिथीने साजरे करतो. तारखेने साजरे करत नाही. गेल्यावर्षी दिवाळी कोणत्या तारखेला होती. यावेळी दिवाळी त्याच तारखेला येत नसते. मागच्या वर्षी गणपती ज्या तारखेला आले त्याच तारखेला या वर्षी गणपती येत नसतात.
तसेच गणेशोत्सव तिथीनुसार येतो. त्यामुळे शिवजयंतीही तिथीनुसारच साजरी केली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. जन्म दिवस आणि वाढदिवस आपले. महापुरुषांचा तोही छत्रपतींचा जन्म दिवस आपल्यासाठी सण आहे. म्हणून तो सण तिथीने साजरा करायचा, असं राज म्हणाले.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मी भाषणाला उभा नाही. मी व्यासपीठावर येण्याचं एकमेव कारण तुमचं सर्वांचं दर्शन व्हावं आणि त्यासाठी मी व्यासपीठावर आलोय, मी काही हारतुरे घ्यायला आलेलो नाही. आज शिवजयंती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा शिवजंयती आपण तिथीने साजरी करतो, याचा अर्थ आज साजरी करायची असा नव्हे.”
राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना उद्देशून यावेळी टोला लगावला आहे. ‘लोकांना विश्वास वाटला पाहिजे की या शाखेत आल्यानंतर मला न्याय मिळेल. ही शाखा आहे दुकान नव्हे. त्यामुळे त्याचं पावित्र्य तुम्ही राखलं पाहिजे. एवढी फक्त मी तुम्हाला विनंती करतो,’ असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे राज ठाकरे स्टेजवर येत असताना कार्यकर्त्यांनीही स्टेजवर धाव घेतली. एकाच वेळी असंख्य कार्यकर्ते स्टेजवर आल्याने स्टेज कोसळला. स्टेजचा मधला भाग अचानक खचल्याने त्यात काही महिला अडकल्या. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या
राज ठाकरे म्हणतात, “छत्रपतींचा जन्मदिवस म्हणजे आपल्यासाठी तो सण आहे आणि म्हणून तो…”
‘फुकट वडापाव खाणाऱ्यांची शहर सांभाळण्याची औकात नाही’, राष्ट्रवादीची भाजपवर सडकून टीका
‘सुशांत दिशा सालियानच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता म्हणून त्याची हत्या झाली’, राणेंचा खळबळजनक दावा
किराणा दुकानदाराच्या मुलाने गुगलमध्ये शोधल्या ३०० चुका, मिळाले तब्बल ६५ कोटींचे बक्षिस