रविवारी संध्याकाळी गुजरातमधून खळबळजनक बातमी समोर आली. गुजरातमध्ये घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. पूल दुर्घटनेत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या घटनेचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
गुजरातमधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी झुलता केबल पूल कोसळल्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या पूलावर छटपूजेच्या निमित्ताने 500 ते 600 भाविक उपस्थित होते. अचानक पूल कोसळल्यामुळे अनेक महिला व लहान मुलेदेखील नदीत कोसळले.
मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 141 च्याही पुढे गेला असल्याच बोललं जातं आहे. तसेच पूल कोसळतानाचं सीसीटीव्ही समोर आलं असून यामध्ये काही तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहेत. काही तरुणांनी पुलावर केलेल्या हुल्लडबाजीमुळेच दुर्घटना झाल्याचा दावा काही साक्षीदार करत आहेत.
https://twitter.com/MrsGandhi/status/1586765673081937921?s=20&t=6u-EYErF9pFN068JsjCAfg
व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे की, पुलावर असलेले काही जण पुलाच्या तारा हलवत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचबरोबर काही तरुण फोटोशूट करत असताना, त्यांच्या पुढे उभे असणारे तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, यादरम्यान पूल हालत असल्याचंही देखील पाहायला मिळत आहे. दिवाळीची सुट्टी आणि रविवार असल्यामुळे पुलावर पर्यटकांची गर्दी होती. यात महिला आणि मुलांची संख्या जास्त असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. अनेकांनी या दुर्घटनेत आपला जीव गमावला आहे.
या दुर्घटनेबाबत माहिती देताना प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ‘रविवारी सुट्टी असल्याने पुलावर गर्दी होती. फोटो काढण्यासाठी सर्वांचीच लगबग सुरू होती. फोटो काढण्यासाठी पुलाच्या मध्यभागी जाण्याचा प्रयत्न करत होते. पुलाच्या मधोमध मोठी गर्दी झाल्याने पूल त्या ठिकाणाहून तुटला.
धक्कादायक बाब म्हणजे आता अशीही माहिती समोर येत आहे की, काही तरुण पुलावर पाय मारत होते. काही तरुणांनी स्विंग ब्रिज तोडण्याचा प्रयत्न केला. यामुळे ही दुर्घटना घडली असल्याच देखील बोलल जातं आहे. या अपघातामध्ये महिला आणि लहान मुले सर्वाधिक आहेत.
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी…
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर