पॉवर ग्रीड-टाटा प्रकल्पाशी(Power grid tata project) संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. CBI ने पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बीएस झा यांना भ्रष्टाचाराशी संबंधित एका प्रकरणात अटक केली आहे.(cbis-big-action-in-tata-projects-case-6-officers-arrested)
यासोबतच टाटा प्रोजेक्ट्सच्या पाच अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. टाटा प्रोजेक्ट्स या प्रायव्हेट कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये तिचे कार्यकारी उपाध्यक्ष देशराज पाठक(Deshraj Pathak) आणि सहाय्यक उपाध्यक्ष आर.एन. सिंग यांचा समावेश आहे. हे प्रकरण एका प्रायव्हेट कंपनीला फायदा करून देण्याच्या बदल्यात कथित लाच घेण्याशी संबंधित आहे.
बुधवारी सीबीआयने(CBI) गाझियाबाद, नोएडा, गुरुग्राम आणि इतर ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. यादरम्यान झा यांच्या गुरुग्राम परिसरातून 93 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की झा सध्या इटानगरमध्ये तैनात आहेत.
सीबीआय झा(Zha) यांच्यावर लक्ष ठेवून असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, झा हे टाटा प्रकल्प आणि इतर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून विविध कामांसाठी लाच घेत असल्याची माहिती मिळाली होती.
तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी अवैध पैशांचा व्यवहार करणाऱ्या ठिकाणी छापे टाकून आरोपींना अटक केली. अधिकाऱ्यांनी सर्व सहा आरोपींना गुरुवारी पंचकुला (हरियाणा) येथील न्यायालयात हजर केले.