Share

‘नितीन गडकरी यांच्या विरोधातही CBI चा वापर होणार आहे’

देशभरात माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम पार पडत आहेत. नुकतेच नागपूर येथेही टेन्को रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या कार्यक्रमाला कन्हैया कुमारने हजेरी लावत, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर हल्ला चढवला.

कन्हैया कुमारने केंद्रीय तपास यंत्रणांच्या मुद्द्यावरुन भाजपवर आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला. जे या देशाला विकत आहेत, त्यांना शुद्धीवर आणण्याची गरज आहे. ज्या लोकांना या देशाला वाचवायचं आहे ते लोकच देश विकणाऱ्यांना शुद्धीवर आणतील, असा इशारा त्याने केंद्र सरकारला यावेळी दिला.

तसेच, केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापर होत असल्याचा आरोप करत कन्हैया कुमार म्हणाला, ‘मला तर भीती वाटत आहे की कधी नितीन गडकरी यांच्या विरोधातही CBI चा वापर होईल’, असा टोला देखील कन्हैयाने यावेळी भाजपला लगावला आहे.

याआधी २०२१ मध्ये देखील पंतप्रधान मोदींवर टीका करताना तो म्हणाला होता की, ‘मी पंतप्रधानांसारखा नापास झालो नाही. माझं मार्कशीट पाहू शकता. देशातील एक व्यक्ती अर्ध्या रात्री येऊन टीव्हीवर काही बोलत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचं भलं होणार आहे’, अशी खोचक टीका त्याने मोदींवर केली.

अग्नीपथ योजनेवरुनही कन्हैया कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. केंद्र सरकारने ही योजना आणताना देशातील तरूणांशी संवाद साधणं गरजेचं होतं. अग्निपथ योजना आम्ही आणतोय, त्याबाबत केंद्र सरकारने कुणाशी आणि काय चर्चा केली, त्याबाबत स्पष्टीकरण द्या, असा आक्रमक पवित्रा त्याने घेतला होता.

एवढेच नाही तर, अग्निपथ योजना सरकारने मागे घ्यावी, सरकारने लॉलीपॉप दाखवायचं बंद करायला हवं. सैन्यात जाणारे गरीब, शेतकरी, कष्टकरी असतात, राजकीय नेत्यांची मुलं सैन्यात जात नाहीत, अशी घणाघाती टीका कन्हैया कुमारने मोदींवर केली होती.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now