पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळख असणारे अविनाश भोसले यांचे काल सीबीआयकडून हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहे. अविनाश भोसले सध्या येस बँक आणि डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणात अटकेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भोसले यांची सीबीआय चौकशी करत आहे.
अविनाश भोसले यांना २६ मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना १० दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने भोसले यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
त्यानंतर आज त्यांचे खासगी हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येस बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोसले यांचेही नाव पुढे आले होते. त्यानुसार, सीबीआयकडून भोसले यांचा तपास सुरु होता. भोसले यांचे घर व काही मालमत्तांवर एप्रिल महिन्यात सीबीआयने छापे टाकून काही मोठ्या प्रमाणात झाडाझडती घेतली होती.
त्याचवेळी त्यांच्या मालमत्तांमधून महत्वाची कागदपत्रेही त्यांनी जप्त केली होती. अविनाश भोसले हे वाधवान बंधूंचे अत्यंत जवळचे मानले जातात. या घोटाळ्याच्या पैशातून हे हेलिकॉप्टर खरेदी केल्याच्या संशयावरून सीबीआयने हे हेलिकॉप्टर ताब्यात घेतल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
माहितीनुसार, सीबीआय’ने त्यांची तब्बल ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. मागील काही वर्षांपासून येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणाचा तपास सीबीआय’कडून सुरु आहे. त्यांनी यापुर्वी उद्योजक संजय छाब्रिया यांना अटक केली आहे, तर विनोद गोएंका व शाहीद बलवा यांच्यावरही कारवाई केली आहे.
दरम्यान, याच बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोसले यांचेही नाव पुढे आले होते. त्यानुसार, सीबीआय’कडून भोसले यांचा तपास सुरु होता. भोसले यांचे घर व काही मालमत्तांवर एप्रिल महिन्यात “सीबीआय’ने छापे टाकून काही मोठ्या प्रमाणात झाडाझडती घेतली होती. त्याचवेळी त्यांच्या मालमत्तांमधून महत्वाची कागदपत्रेही त्यांनी जप्त केली होती.